Eknath Shinde News : भुमरेमामांच्या विजयाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली, संभाजीनगरात तळ ठोकला...

Chhatrapati Sambhajinagar Loksabha News : संदिपान भुमरे यांच्यावर विरोधक तुटून पडले आहेत. बाहेरचा उमेदवार आणि वैयक्तिक व्यवसायाचे मुद्दे पुढे करून भुमरे यांची कोंडी...
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावर शिवसेनेची पकड कायम राहावी, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा स्वतःकडे खेचून घेतली. भाजपची तीन वर्षांची तयारी, केंद्रीय अमित शाह (Amit Shah) यांनी जाहीर सभेतून संभाजीनगरची जागा आपणच लढवणार असे स्पष्ट संकेत दिल्यानंतरही शिंदेनी ही जागा राखली.

उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच शेवटपर्यंत सुरू होती, पण यात शिंदेची सरशी झाली आणि त्यांनी मंत्रिमंडळातील सहकारी संदिपान भुमरे यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाच दिवस आधी जाहीर केली. तीन वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरल्यामुळे साहाजिकच भाजपच्या गोटात कमालीची नाराजी पसरली.

Eknath Shinde
Ujjwal Nikam News : 'पूनम महाजन तुमच्या प्रचारात का दिसत नाहीत?' निकम म्हणाले, "नाराजीचा सूर..."

ती प्रचारसभा, बैठका, मेळावे यातून स्पष्टपणे दिसू लागली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः संभाजीनगरची सुत्रं हाती घेतली. कल्याण लोकसभा मतदारसंघात पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या मतदारसंघा इतकचे महत्व आणि लक्ष त्यांनी संभाजीनगरच्या जागेला दिल्याचे बोलले जाते. संदिपान भुमरे यांच्यावर विरोधक तुटून पडले आहेत. बाहेरचा उमेदवार आणि वैयक्तिक व्यवसायाचे मुद्दे पुढे करून भुमरे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न महाविकास आघाडीकडून सातत्याने सुरू आहेत.

अशावेळी भुमरेमामांच्या बाजूने किल्ला लढवण्याची जबाबदारी स्वतः शिंदे यांनी स्वीकारल्याचे दिसते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुख्यमंत्री संभाजीनगरात तळ ठोकून आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठका, उद्योजक, डाॅक्टर, वकील अशा लोकांशी स्वतंत्र चर्चा आणि बुथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांनाच भुमरे यांना ग्रामीण भागातून अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी प्रचार सभा घेण्यात शिंदे गुंतले आहेत.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

महायुती असली तरी निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच लीड रोलमध्ये दिसत आहेत. भाजपने शेवटच्या टप्प्यात भुमरेंच्या प्रचारात जोर लावल्याचे चित्र आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आमची शिवसेना खरी शिवसेना हे मतदारांच्या गळी उतरवण्यात मुख्यमंत्री व त्यांच्या शिलेदारांना यश मिळते का? हे ठरवणारी ही निवडणूक आहे.

मुंबई, ठाणे, पुण्यानंतर सर्वाधिक यश शिवसेनेला संभाजीनगर व मराठवाड्यात मिळाले. शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे स्वतः याचे साक्षीदार आहेत. त्यामुळे संभाजीनगरची जागा जिंकणे किती महत्वाचे आहे, याची जाणीव त्यांनी आहे. या जाणिवेतून त्यांनी संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्यासाठी जोर लावला आहे.

मंत्रिमंडळात अनेक मंत्र्यांना त्यांनी संभाजीनगरमध्ये येऊन प्रचार, सभा, काॅर्नर बैठका, कार्यकर्त्यांशी चर्चा कण्याचे आदेश दिले आहे. एकूणच भुमरेमामांच्या विजयाची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्र्यांनीच आपल्या खांद्यावर घेतल्याचे दिसून आले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Eknath Shinde
Udayanraje Bhosale : पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे उतरले बीडच्या मैदानात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com