Sandipan Bhumre News : नाथषष्ठीच्या पुजेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण

Chhatrapati Sambhajinagar : शहर सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
Cm Eknath Shinde-Dcm Fadanvis News, Paithan
Cm Eknath Shinde-Dcm Fadanvis News, PaithanSarkarnama
Published on
Updated on

Paithan : नाथषष्टी यात्रा उत्सव काळात पैठण येथे राज्यभरातून भाविक येतात. यंदा १५ लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व विभागांनी भाविकांना तत्पर सेवा देण्यासाठी समन्वयाने काम करावे आणि यात्रा उत्सव आनंदात साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी केले.

Cm Eknath Shinde-Dcm Fadanvis News, Paithan
Ramdas Athwale News : राऊत जेलमध्ये जावून आलेत, त्यांनी भान ठेवून बोलावे..

पंढरपुर प्रमाणे संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्टी सोहळ्याच्या शासकीय पुजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना निमंत्रण देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Paithan) पैठण येथे साजऱ्या होणाऱ्या नाथषष्टी यात्रा उत्सवाबाबत विविध विभागाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला.

भुमरे म्हणाले, भाविकांची येणारी संख्या पाहता शहरात तात्पुरते बसस्थानक उभारण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा, आरोग्य सुविधा तत्पर ठेवावी तसेच भाविकांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी. भाविकांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी आत्ताच नियोजन करावे, शहर सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

या बैठकीत एसटी वाहतुक सुविधा, आरोग्य विभाग पुर्व तयारी, नाथषष्टी काळात जायकवाडी धरणातुन गोदापात्रात सोडण्यात येणारे पाणी, गोदावरी वाळवंटातील साफसफाई, बीएसएनएल दुरसंचार सेवा, नगर पालिका पाणी पुरवठा व्यवस्था, नाथ मंदिर ट्रस्टकडुन भाविकांसाठी सोयी सुविधा, पोलिस बंदोबस्त, जीवन प्राधिकरण यांच्याकडुन करण्यात येणारी कामे, पैठण शहरात विद्युतीकरण सजावट व्यवस्था आदी भौतिक सोयी सुविधा देण्याबाबत आढावा घेण्यात आला.

नाथषष्टी यात्रेसाठी पुर्व तयारीची करण्यात येणारी सर्व कामे प्रगतीपथावर असल्याचे यावेळी सरकारी यंत्रणेच्या संबधित अधिकारी व कर्मचारी, प्रतिनिधींनी सांगितले. बैठकीला अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, प्रभारी पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी, तहसीलदार शंकर लाड, नाथमंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, विश्वस्त विठ्ठल महाराज चनघटे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com