शिवसेना आमची आणि लवकरच 'धनुष्य बाण'ही : बंडखोर आमदार गायकवाडांनी ठाकरेंना ललकारले

Shivsena | Sanjay Gaikwad | : बंडखोरांचा शिवसेनेवर सातत्याने दावा सुरु असतानाच आता थेट पक्षाच्या चिन्ह्यावरच दावा
MLA Sanjay Gaikwad
MLA Sanjay GaikwadSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे गटनेते म्हणून आमदार अजय चौधरी (Ajay choudhari) यांच्या जागी पुन्हा एकदा बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena) हा मूळ पक्ष वेगळा असतो आणि विधिमंंडळ पक्ष वेगळा असतो, असे सांगत सर्व बंडखोर आमदार हे आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहेत.

अशातच ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह देखील आपल्यालाच मिळेल असा दावा बंडखोर आमदार करत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी थेट नेतृत्वाच्या दिशेने हल्लाबोल करीत पक्षाच्या चिन्हावर दावा सांगितला आहे. (Shivsena Eknath shinde | Latets News)

राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर पहिल्यांदाच बुलढाण्याला आपल्या स्वगृही परतल्यानंतर आमदार गायकवाड बोलत होते. ते म्हणाले, ज्यावेळी 'महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, त्यावेळी आम्हालाही आनंद झाला होता. पण कालांतराने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आम्हाला निधी मिळू दिला नाही, आमच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या. त्यामुळे फुटलेले सर्वच आमदार व्यतिथ होते. त्यामुळे असा निर्णय आम्हाला घ्यावा लागला.

पुढे बोलताना गायकवाड यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही तोफ डागली. ते म्हणाले, "संजय राऊत हा राष्ट्रवादीची सुपारी घेऊन संपूर्ण शिवसेना संपवायला निघाला होता, त्यामुळे सर्वच जण हे व्यथित होते. उद्धव ठाकरे हा देव माणूस असून आजही सर्व आमदार त्यांचा आदर करतात, पण त्यांच्या भोवती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असल्याने त्यांना सुचू देत नव्हते व त्यामुळे शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागत असे. पण लवकरच आम्हाला शिवसेनेचच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात सगळं चित्र स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com