Shivsena Leader Sanjay Raut News : देशात दोनच सेना, एक सीमेवर अन् दुसरी आपली

Sanjay Raut says, there are only two armies in the country, one on the border and the other is ours : शिवसेनेचा आमदार नाही तेथे आम्हाला शिवसेनेचा आमदार निवडून आणायचा आहे. शिवसेनेत मायेचा ओलावा आहे तर याउलट भाजपचे काम 'गरज सैरो वैद्य मरो'असे असल्याचा टोला राऊत यांनी आपल्या भाषणात लगावला.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

बा.पु. गायकर

Nanded Shivsena Political News : शिवसेनेच्या स्थापनेनंतर राज्यात तब्बल 180 सेना स्थापन झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 181 वी, पण देशात फक्त दोनच सेना आहेत, एक सीमेवर लढणारी अन् दुसरी आपली म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला.

लोहा येथील शिवसंवाद मेळाव्यात राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि महायुतीवर टीका केली. देश, राज्य आणि सर्वसामान्य जनतेसाठी भाजपची भूमीका स्वार्थी आणि दुटप्पी आहे. खोटे बोलण्याची त्यांची सवय पुर्वीचीच आहे. भाजपला राज्यात पोस्टर चिटकावयला माणूस नव्हता, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सोबत घेतले. आज तेच आमच्या मुळावर उठलेत, पण ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या मर्द मावळ्याची आहे, ती यांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही.

मी अनेक शिवसंवाद मेळाव्यांना हजर राहिलो, पण ज्या मतदार संघात शिवसेनेचा आमदार नाही तेथे आम्हाला शिवसेनेचा आमदार निवडून आणायचा आहे. शिवसेनेत मायेचा ओलावा आहे तर याउलट भाजपचे काम 'गरज सैरो वैद्य मरो'असे असल्याचा टोला राऊत यांनी आपल्या भाषणात लगावला. लोहा-कंधारमध्ये निजामाशी लढणारी पिढी आहे, पण इथे रस्ते, पाणी नाही. निझामासोबत लढलेल्या भागाची अशी भकास अवस्था करणाऱ्याना आता घरी बसवा, असे आवाहन राऊत यांनी केले.

Sanjay Raut
Sanjay Raut: हे प्रोटोकॉल, संविधानाला धरून आहे का? चंद्रचूड अन् मोदींना राऊतांचा प्रश्न

आता विकासासाठी राज्यात मशालीचा यज्ञ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पेटविला जात आहे. (Shivsena) आमचे सरकार आल्यावर लाडक्या बहिणीला दीड हजारच काय आम्ही तीन हजार रुपये देऊ, असेही राऊत यांनी सांगितले. या मेळाव्यात अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com