Marathwada News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, आम्ही आता विरोधकांच्या आरोपांना विकास कामांनी उत्तर देणार, असे केल तरच त्यांचे आरोप, टीका बंद होतील. पण त्यांच्यासोबतच्या आमदारांच्या काही हे पचनी पडतांना दिसत नाहीये. विशेषतः मंत्रीमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील असलेले आमदार तर ठाकरे गटावर अक्षरशः तुटून पडतात.
यापैकीच एक म्हणजे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट. (Sanjay Shirsat) तीन टर्म आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. शिंदेंच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद पक्के असे वाटत असतांना त्यांना वेटिंगवर ठेवत जिल्ह्यातील दुसरे आमदार अब्दुल सत्तार यांना कॅबिनेटपदी पढती देण्यात आली. (Marathwada) तर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या भुमरेंना पुन्हा संधी मिळाली. त्यामुळे शिरसाटांची बेचैनी अधिकच वाढली.
त्यामुळे हा सगळा राग आणि नाराजी ते ठाकरे गटावर टीका करतांना काढतांना दिसतात. विशेष म्हणजे मंत्रीमंडळ विस्तार जवळ आला किंवा तशा हालचाली सुरू झाल्या की शिरसाट बेफाम सुटतात. काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या हिंदू जनजागृती महारॅलीनंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना शिरसाटांचा रुद्रावतार पहायला मिळाला.
बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देतांना शिरसाटांनी आदित्य ठाकरे यांची अक्कलच काढली. एवढेच नाही, तर बाळासाहेबांच्या नावाचा ठाकरे पितापुत्रांनी टक्केवारी वाढवून घेत दुकानदारी केल्याचा गंभीर आरोप देखील केला. आम्हाला बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचा हक्क नाही, असे म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत मारले पाहिजे, असेही शिरसाट म्हणाले.
एकंदरित शिरसाट यांचा आदित्य ठाकरेंवर एवढा राग का आहे? यामागे सध्या उद्धवसेनेकडून शिरसाटांच्या पश्चिम मतदारसंघातील बजाजनगर व अन्य भागात सुरू असलेले कार्यक्रम आणि आगामी विधानसभेची तयारी हे असल्याचे समजते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिरसाटांविरुद्ध वातावरण तयार करण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
एकंदरित शिरसाट यांचा आदित्य ठाकरेंवर एवढा राग का आहे? यामागे सध्या उद्धवसेनेकडून शिरसाटांच्या पश्चिम मतदारसंघातील बजाजनगर व अन्य भागात सुरू असलेले कार्यक्रम आणि आगामी विधानसभेची तयारी हे कारण असल्याचे समजते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिरसाटांविरुद्ध वातावरण तयार करण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.