Sanjay Shirsat on Danve and Sattar dispute : 'सत्तार-दानवेंचं भांडण गंभीर की 'टाईमपास' हे बघावं लागेल' ; शिरसाटांनी घेतली सावध भूमिका!

Raosaheb Danve and Abdul Sattar Dispute : वाद जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात जाईल, तेव्हाच काय तो निर्णय होईल, असंही शिरसाट म्हणाले आहेत.
Sanjay Shirsat Raosaheb Danve and Abdul Sattar Dispute
Sanjay Shirsat Raosaheb Danve and Abdul Sattar Dispute Sarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. तेव्हापासून शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या दोघांच्या भांडणावर शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे.

दानवे-सत्तार यांची राजकीय मैत्री गेल्या अनेक वर्षापासून आहे. त्यामुळे सध्या त्यांच्यात खरंच भांडण सुरू आहे, की हे त्यांचे मैत्रीचे भांडण आहे? हे आधी तपासावे लागेल. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहावे की टाईमपास म्हणून? हा खरा प्रश्न असल्याचा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.

या दोघांचा वाद जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या कोर्टात जाईल, तेव्हाच काय तो निर्णय होईल, असे सांगत शिरसाट यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. त्यांच्यात सध्या सुरू असलेले भांडण खरे आहे की मैत्रीचे? याबद्दलच शिरसाट यांनी शंका उपस्थित केली.

Sanjay Shirsat Raosaheb Danve and Abdul Sattar Dispute
(Video) Abdul Sattar Vs Raosaheb Danve : अब्दुल सत्तार कधी कोणाशी एकनिष्ठ राहिलेत, ते माझ्याशी राहतील; दानवेंनी निशाणा साधला

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी लाखाच्या मताधिक्याने पराभव केला. ज्या मतदारसंघावर दानवे यांनी 30 वर्षे आणि विधानसभेच्या भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघावर 10 वर्षे अशी एकूण 40 वर्षे अधिराज्य गाजवले, त्याच जिल्ह्यात यावेळी दानवे(Raosaheb Danve) यांची पिछेहाट झाली. विधानसभेच्या सहाही मतदारसंघात दानवे मागे पडले. यावरून गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील राजकारण तापले आहे.

सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून काळे यांना लीड मिळाल्याने मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर काम न केल्याचा ठपका बसला आहे. सत्तार यांनी स्वतः तशी कबुली दिली आहे. त्यानंतर रावसाहेब दानवे आणि सत्तार(Abdul Sattar ) यांच्यात कलगितुरा आणि आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून संजय शिरसाट यांना जेव्हा माध्यमांनी या दोघांच्या भांडणावर प्रतिक्रिया विचारली, तेव्ही शिरसाट यांनी त्या दोघांच्या राजकीय मैत्रीचा दाखला दिला.

Sanjay Shirsat Raosaheb Danve and Abdul Sattar Dispute
Raosaheb Danve News : रावसाहेब दानवे विधानसभेच्या आखाड्यात उतरून अब्दुल सत्तारांचा वचपा काढणार?

सध्या संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत स्पर्धा सुरू आहे. संभाव्य मंत्रीमंडळ विस्तारात संजय शिरसाट यांना स्थान मिळेल आणि पालकमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल, अशी अपेक्षा त्यांचे समर्थक लावून आहेत.

तर दुसरीकडे सत्तार यांनी आपली पालकमंत्री होण्याची इच्छा असल्याचे सांगत शिरसाट यांच्या मार्गात खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे भाजपनेही या पदावर दावा सांगत शिरसाट-सत्तार दोघांची डोकेदुखी वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर दानवे-सत्तार यांच्या भांडणाला अधिक महत्व न देता त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका शिरसाट यांनी घेतल्याचे बोलले जाते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com