Sanjay Shirsat News : चंद्रकांत खैरे थकलेले नेते, त्यांच्यावर टीका करण्यात वेळ घालवू नका..

Shivsena : मी मुंबईत थांबतो म्हणून टीक करणारे स्वतःच आता मुंबईत बसून असतात, असा टोला शिरसाट यांनी अंबादास दानवे यांना लगावला.
Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News
Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर अनेकांना पोटशूळ उठला. ज्या बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नावावर इतक्या वर्ष पोटं भरली त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चात सहभागी व्हायची आता लाज वाटू लागली, अशा शब्दात आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटावर टीका केली. चंद्रकांत खैरे हा थकलेला नेता आहे, त्यांच्यावर टीका करण्यात वेळ घालवू नका, असे आवाहन देखील त्यांनी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना केले.

Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News
Ajit Pawar News : आधी म्हणाले औरंगाबाद, मग छत्रपती संभाजीनगर..

शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात संजय शिरसाट बोलत होते. येत्या ८ एप्रिल रोजी शिवसेनेच्या वतीने शहरातून धनुष्यबाण या चिन्हाची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. क्रांतीचौक भागातून निघणाऱ्या या रॅलीचा समारोप छत्रपती संभाजी महाराज यांच्या हडको येथील पुतळ्याजवळ करण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तिथे सभा होणार आहे. या रॅली आणि सभेच्या पुर्वतयारीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती.

यावेळी शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली. शिरसाट म्हणाले, आमची ३८ वर्ष शिवसेनेत गेली, पण काल आलेली ती अंधारे नावाची बाई आम्हाला शिकवते. ठाकरे गटाच्या नेत्यांना देखील या ताईंची आता अडचण व्हायला लागली आहे, अंबादास दानवे मला हे सांगितले. विधानसभेत ठाकरे गटाचे शिल्लक आमदार जनतेच्या प्रश्नावर काहीच बोलत नाही, तालिका अध्यक्ष म्हणून मी हे पाहिले आहे.

आधी मी मुंबईत थांबतो म्हणून टीक करणारे स्वतःच आता मुंबईत बसून असतात, असा टोला देखील शिरसाट यांनी अंबादास दानवे यांना लगावला. पाच एप्रिल रोजी आम्ही सगळे आमदार, मंत्री, जिल्हाप्रमुख आयोध्येला जाणार आहोत. तिकडून आल्यानंतर ८ किंवा ९ तारखेला आपल्याला शहरातून न भुतो न भविष्यती अशी रॅली काढायची आहे.

या शिवाय घराघरावर छत्रपती संभाजीनगर लिहलेले झेंडे लावण्याचा उपक्रम आपण उद्यापासून हाती घेत आहोत, असेही शिरसाट यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ आपण काढलेल्या मोर्चाची चर्चा संपुर्ण राज्यात होत असल्याचेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com