Sanjay Shirsat On Sharad Pawar : पवारांनी राजीनाम्याची गुगली टाकत अनेकांचा `करेक्ट कार्यक्रम` केला..

Marathwada : आतापर्यंत त्यांनी जी भूमिका घेतली, त्याच्या अगदी उलटे घडते हा इतिहास आहे.
Sanjay Shirsat On Sharad Pawar, News.
Sanjay Shirsat On Sharad Pawar, News.Sarkarnama

Shivsena : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारसाहेब (Sharad Pawar) हे काही साधे नेते नाहीत. राज्याचा आणि देशाचा अभ्यास असलेले ते एक मोठे नेतृत्व आहे. त्यामुळे कोणत्यावेळी ते काय भूमिका घेतील आणि राजकारणात खळबळ उडवून देतील याचा अंदाज बांधता येत नाही. अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे जे नाट्य घडले, ते म्हणजे शरद पवार साहेबांनी ठरवून टाकलेली गुगली होती. त्यांच्या या गुगलीने पक्षांतर्गत आणि बाहेरचे अशा दोन्ही विरोधकांचा त्यांनी करेक्ट कार्यक्रम केला, अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले.

Sanjay Shirsat On Sharad Pawar, News.
Sanjay Shirsat On Ajit Pawar : मी त्यांच्या पक्षाचा नाही म्हणून निधी नाकारला होता, तरी अजित पवार चांगला माणूस..

छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी राष्ट्रवादीत घडलेले शरद पवारांच्या अध्यक्षपदाचे राजीनामा नाट्य विषयावर भूमिका मांडली. (Sanjay Shirsat) संजय शिरसाट म्हणाले, शरद पवार हे राजकारणातील एक असे मोठे नेते आहेत, जे अजूनही कुणाला कळलेले नाहीत. (Shivsena) आतापर्यंत त्यांनी जी भूमिका घेतली, त्याच्या अगदी उलटे घडते हा इतिहास आहे.

त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्या बाबतीतही तेच घडले. मुळात शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची गुगली टाकली होती. (Marathwada) त्या गुगलीच्या जाळ्यात त्यांच्या पक्षातील आणि पक्षाबाहेरी असे दोन्ही विरोधक अडकले. या गुगलीने त्यांनी अनेकांचा करेक्ट कार्यक्रम केला. अजित पवार हे या राजीनामा नाट्यात व्हिलन ठरले.

एवढी मोठी घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावर कुठलीही प्रतिक्रिया किंवा तणाव जाणवला नाही. त्यामुळे अनेकांना याची कल्पना होती अशी शंका निश्चित येते. शरद पवारांनी या राजीनामा नाट्यातून पक्षांतर्गत होणार विरोध तर हाणून पाडलाच, पण त्यांना इंगा दाखवून पुन्हा असा प्रयत्न कराल तर काय गत होईल, असा सूचक इशारा देखील दिला, असल्याचे शिरसाट म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com