Sanjay Shirsat On Ncp : आजच्या राजकीय परिस्थितीला उद्धव ठाकरेच जबाबदार..

Maharashtra : राष्ट्रवादीच्या सत्तेत येण्यामुळे आम्हाला तडजोडी कराव्या लागणार आहेत. पण कुणावरही अन्याय होणार नाही.
Sanjay Shirsat On Ncp News
Sanjay Shirsat On Ncp NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena : आज राज्याच्या राजकारणात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे आणि त्यांच्या इगो जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. (Sanjay Shirsat On Ncp) २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पहिली अडीच वर्ष कुणाची? या उद्धव ठाकरेंच्या इगोमुळे ते राष्ट्रवादी-काॅंग्रसे सोबत गेले.

Sanjay Shirsat On Ncp News
Mp Omraje Nimbalkar News : उद्धव साहेबांनी कायम मुलासारखे प्रेम, माया दिली...

आम्हाला बाळासाहेबांचे विचार सोडून त्यांच्यासोबत जावे लागले आणि नंतर उठाव करावा लागला. उद्धव ठाकरेंनी तेव्हा हट्ट सोडला असता तर आज राज्यात ही परिस्थिती निर्माण झालीच नसती, असा दावा देखील शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आहे.

राज्यातील सरकार मजबुत असतांना त्यांना इतर कुणाची गरज नसतांना अजित पवार ३० आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. त्यांना सुरुवातीलाच ९ मंत्रीपद मिळाली. (Uddhav Thackeary) या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या (Shivsena) शिवसेना व भाजपच्या गोटात देखील नाराजी असल्याचे बोलले जाते. या मुद्यावर संजय शिरसाट यांनी भूमिका स्पष्ट केली.

शिरसाट म्हणाले, लोकांच्याच काय आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मनात देखील अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरं आम्हाला द्यावी लागत आहेत. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खंबीर आहेत, त्यांच्यात चांगला समन्वय आहे. त्यामुळे जे घडले ते दोघांच्या विचाराने आणि संमतीने घडले आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय, काही तडजोडी कराव्या लागतात. त्यातलाच हा प्रकार आहे, सरकारकडे १७२ पेक्षा अधिकचा आकडा असतांना राष्ट्रवादीला सोबत घेण्याची खरज गरज होती का? नव्हती पण भविष्यातली गरज म्हणून हे करावे लागले. राष्ट्रवादीच्या सत्तेत येण्यामुळे आम्हाला तडजोडी कराव्या लागणार आहेत. पण कुणावरही अन्याय होणार नाही, मुख्यमंत्री शिंदे तो होवू देणार नाही.

राष्ट्रवादीला देण्यात आलेली मंत्रीपद ही एकट्या शिवसेनेच्या खात्यातली नाहीत, ती भाजपच्या इच्छूकांना डावलून देखील देण्यात आली आहे. त्यामुळे तडजोड करावी लागणार हे नाकारून चालणार नाही, याचा पुनरुच्चार देखील शिरसाट यांनी केला. २०१४ मध्ये शरद पवारांनी गरज नसतांना भाजपला बाहेरून सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देत गुगली टाकली होती. पुन्हा पहाटेच्या शपथविधीच्यावेळी तोच प्रकार घडला. पण तुमच्या प्रत्येक गुगलीवर समोरच्याच विकेट जाईल असे होत नाही. एखादा तुमचीच विकेट घेवून जातो, अजित पवारांच्या बंडाने तेच घडले, असा टोला देखील शिरसाट यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.