Sanjay Shirsat News :'मी राजकारणातून निवृत्त होणारच'! मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून दुसऱ्यांदा उल्लेख

Sanjay Shirsat Statement : शिरसाट यांना आपण आता थांबलं पाहिजे असं वाटू लागलं आहे. यामागे कुटुंबातील मुला- मुलीचा राजकीय प्रवास पुढे नेटाने सुरू राहावा, हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते.
Sanjay Shirsat Political Retirement Statement News
Sanjay Shirsat Political Retirement Statement NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

  2. “मी थांबणारच,” या त्यांच्या विधानाने समर्थक आणि विरोधकांमध्ये चर्चा रंगली आहे.

  3. त्यांच्या या वक्तव्याने छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

Shiv sena News : संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी 'आपण आता थांबण्याचा विचार करत आहोत' असे म्हणत राजकीय संन्यास घेण्याचा विचार जाहीर कार्यक्रमातून बोलून दाखवला होता. राज्यात महायुतीची सत्ता आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री पद असताना संजय शिरसाट यांना राजकीय संन्यास घ्यावासा का वाटतो? याची चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती. काल नांदेड दौऱ्यावर असताना शिरसाट यांनी पुन्हा आपल्या राजकीय निवृत्तीवर भाष्य करत आपण थांबणार असल्याचे संकेत दिले.

'निश्चितच मला निवृत्त व्हायचे आहे, परंतु अजून निवडणुकीला चार वर्ष शिल्लक असल्यामुळे त्याचा विचार आत्ताच कशाला करायचा' असे म्हणत शिरसाट यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक येत्या महिनाभरात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांचा भावी महापौर म्हणून उल्लेख असलेले बॅनर शहराच्या मुख्य चौकात लागले होते. यावरून शिवसेनेतील इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली होती.

संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट हे महापालिकेत नगरसेवक राहिलेले आहेत. तर त्यांच्या कन्या हर्षदा शिरसाट या देखील राजकारणात सक्रिय होत आहेत. शिरसाट यांचा राजकीय प्रवास हा महापालिकेतील नगरसेवक पदापासून सुरू झाला तो आज राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पदापर्यंत येऊन पोहोचला आहे. कुटुंबात राजकारणात येण्यासाठी सुरू झालेल्या स्पर्धेतून शिरसाट यांनी निवृत्तीचा विचार बोलून दाखवला का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Sanjay Shirsat Political Retirement Statement News
Sanjay Shirsat : संजय शिरसाट म्हणतात, आता थांबल पाहिजे! राजकीय निवृत्ती की नवे नेतृत्व पुढे आणण्यासाठीची खेळी?

सलग तीन टर्म आमदार आणि आता मंत्री झालेल्या संजय शिरसाट यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आपण आता थांबलं पाहिजे असं वाटू लागलं आहे. यामागे कुटुंबातील मुला- मुलीचा राजकीय प्रवास पुढे नेटाने सुरू राहावा, हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते. सिद्धांत शिरसाट यांचा भावी महापौर असा उल्लेख करणारे बॅनर झळकल्यानंतर पक्षांमध्ये या पदासाठी इच्छुक असलेल्या माजी महापौर आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी पसरली होती.

Sanjay Shirsat Political Retirement Statement News
Ambadas Danve Shivsena Vs BJP : अंबादास दानवेंनी फोडला आरोपाचा बॉम्ब; भाजपच्या माजी नगरसेवकाकडून आमदाराच्या हत्येची सुपारी? गिरीश महाजनांचा संदर्भ दिल्यानं खळबळ

सिद्धांत शिरसाट यांनी या बॅनरबद्दल आपल्याला काहीही माहीत नसल्याचे सांगत हात वर केले होते. तर महापालिकेत महापौर कोणाला करायचे याचा निर्णय आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेतील, असे सांगत माजी महापौर आणि इच्छुकांनी वेळ मारून नेली. संजय शिरसाट यांच्या राजकीय निवृत्तीचे संकेत आणि त्यांच्या कुटुंबातील दुसरी पिढी सक्रिय होण्याच्या मार्गावर असल्याने शिवसेनेत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या स्थानिक नेत्यांमध्ये काहीसे असुरक्षिततेचे वातावरण आहे.

मुला-मुलीसाठी मार्ग मोकळा करणार?

राजकारणातील घराणेशाही हा नवा विषय नसला तरी एकाच घरात किती जणांना संधी दिली जावी? याला काही मर्यादा असाव्यात, अशी भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. नांदेडच्या कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी पुन्हा आपल्या राजकीय निवृत्तीवर भाष्य करत या संदर्भात ते किती गंभीर आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच निवडणुकीला आणखीन चार वर्ष शिल्लक असल्यामुळे सध्या आपण हा विचार का करायचा? असे सांगत पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या ऐवजी कुटुंबातील दुसरा सदस्य उमेदवार म्हणून मैदानात उतरणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री म्हणून संजय शिरसाट यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व सूत्र शिरसाट यांच्याकडे सोपवली आहेत. त्यामुळे शिरसाट आपला राजकीय वारसा दुसऱ्या पिढीकडे सोपवून स्वतः बाजूला होतात की मग इतर राजकारण्यांप्रमाणे घुमजाव करून पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात? हे पाहण्यासाठी चार वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

FAQs

1. संजय शिरसाट यांनी नेमकं काय वक्तव्य केलं?
त्यांनी “मी थांबणारच” असे म्हणत पुन्हा राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.

2. संजय शिरसाट कोणत्या पक्षाचे आमदार आहेत?
ते उद्धव शिवसेना (शिंदे गट) आमदार आहेत.

3. हे वक्तव्य कुठे केले गेले?
हे वक्तव्य त्यांनी नांदेड येथील एका स्थानिक कार्यक्रमात बोलताना केले असल्याचे सांगितले जाते.

4. यावर पक्षातील नेत्यांची प्रतिक्रिया काय आहे?
अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी हे वक्तव्य भावनिक असल्याचे म्हटले आहे.

5. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात काय बदल होऊ शकतो?
या विधानामुळे शिवसेनेत अंतर्गत चर्चा आणि राजकीय ताण वाढू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com