Shivsena News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करत महायुतीतील नेत्यांचा रोष ओढावून घेणारे मंत्री संजय शिरसाट यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच समज दिली. ' मला एकनाथ शिंदे यांचा काॅल आला होता, त्यांनी मला सुनावले नाही, तर समजावले. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी केलेल्या सूचनांचे मी पालन करेल, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबद्दल केलेल्या विधानामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह इतर नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शिरसाट हे वारंवार माध्यमांमध्ये आमच्या पक्षाबद्दल चुकीचे समज पसरवतात, त्यांना आवरा अशी भूमिका घेत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर काल एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांना फोन करून महायुतीत तणाव निर्माण होईल, असे विधान करू नका, अशी सूचना केली होती.
यावर एकनाथ शिंदे यांचा मला काॅल आला होता, अशी कबुली संजय शिरसाट यांनी माध्यमांकडे दिली. मला एकनाथ शिंदे यांचा कॉल आला होता, महायुतीत वाद होईल असे विधान करून विरोधकांना संधी देऊ नका, असे त्यांनी मला सांगितले आहे.
मी त्यांच्या सूचनांचे पालन करेल. मला सुनावले असे म्हणण्यात काही अर्थ नाही. एखादी चूक झाली तर मला सांगणे त्यांचा अधिकार आहे, त्याला आम्ही आदेश मानतो. राष्ट्रवादीबाबत मी जे विधान केले होते, ते समन्वयाबाबत केले होते, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठीही दोन टप्प्यात बोलणी सुरू आहे. अंतिम निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार घेणार आहेत. सध्या बोलणी चालू आहे, त्यामुळे इतर कोण काय चर्चा करतात याला अर्थ नाही. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात युती होईल आणि ही निवडणूक लढविली जाईल. कोणता मतदारसंघ कोण लढवेल? दावे प्रति दाव्यांना तसा काही अर्थ नाही.
मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट सांगितले आहेत की, एक महिना पुरेल एवढा इंधन साठा आहे. मात्र, काहीजण स्टॉक करत असल्याने टंचाई जाणवते आहे. काही प्रमाणात टंचाई जाणवत आहे, उद्या पेट्रोल डिझेल मिळेल की नाही? याबाबत नागरिकांना शंका आहे. पण, अडचण येईल अशी शक्यता सध्या नाही.
शेतकऱ्यांना इंधनाची अत्यंत आवश्यकता आहे. शेतकरी पेट्रोल पंपावर रात्र जागून काढत आहे. इंधन मिळाले नाही तर खरीप हंगाम हातातून जाईल ही भिंती शेतकर्यांना आहे. मात्र, डिझेल कमी पडू देणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचेही संजय शिरसाट यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.