Ambadas Danve On Sanjay Shirsat News : चक्रम, वेड्या माणसाला मंत्रिमंडळात ठेवू नका! अंबादास दानवे राज्यपालांना पत्र देणार..

Maharashtra politics heat up as Sanjay Shirsat's statement triggers Ambadas Danve's surprising demand to exclude "madmen" from the state cabinet. : मुलाबाळांवर आणि कुटुंबावर जाऊ नका. मी चक्रम माणूस आहे घराला आग लावायला ही कमी करणार नाही, अशा शब्दात शिरसाट यांनी आरोप करणाऱ्यांना इशारा दिला होता.
Ambadas Danve- Sanjay Shirsat News
Ambadas Danve- Sanjay Shirsat NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : 110 कोटी रुपयांचे हॉटेल 64 कोटींना खरेदी करण्याचा डाव फसल्यामुळे संतापलेल्या मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांवर बोलताना 'मी चक्रम आहे, घराला आग लावू शकतो, असे म्हणत आरोप करणाऱ्या विरोधकांना आव्हान दिले होते. आता त्यांच्या या विधानाचा आधार घेत शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिरसाट यांना सणसणीत टोला लगावला आहे.

'अशा चक्रम माणसाला जो घराला आग लावण्याची भाषा करतो, तो उद्या मंत्रिमंडळ बैठकीत काहीही चक्रमपणा करू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा चक्रम, वेड्या माणसाला आपल्या मंत्रिमंडळात ठेवू नये, अशी मागणी करणारे पत्र आपण राज्यपालांना देणार आहोत, असे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वेस्टेशन भागात असलेल्या हाॅटेल व्हिट्स खरेदी प्रकरणात संजय शिरसाट व त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना हे हॉटेल कमी भावात खरेदी करता यावे यासाठी महसूल विभागाने त्यांना मदत करत सरकारला चुना लावला असा, आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. तसेच या हॉटेल खरेदी विक्री लिलावाची उच्चस्तरीय चौकशी करावी व या प्रक्रियेला रोखावे, अशी मागणी करणारे पत्र अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवले होते. दरम्यान संजय शिरसाट यांनी हॉटेल व्हिट्स खरेदी केल्याची कबुली देत माझ्या मुलासह त्याच्या काही पार्टनरने मिळून व्यवसायासाठी हे हॉटेल खरेदी केले आहे.

Ambadas Danve- Sanjay Shirsat News
Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या मागचे शुक्लकाष्ठ संपेना... हॉटेल व्हिट्सच्या खरेदी प्रक्रियेतील माघारही चांगलीच महागात पडणार!

न्यायालयाच्या परवानगीनुसार आणि नियमानुसार हा व्यवहार झाला आहे. मराठी माणसाने एखाद्या व्यवसायात उडी घेतली, तर तुमच्या पोटात का दुखते? असे म्हणत शिरसाट यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, अंबादास दानवे यांच्यावर पलटवार केला होता. मात्र त्यानंतरही या हॉटेल खरेदीचे प्रकरण अधिकच चिघळत असल्याने शिरसाट यांनी काल या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत राऊत किंवा अंबादास दानवे यांनी या लिलावात भाग घेऊन 90 कोटीमध्ये हॉटेल खरेदी करावे, असे आव्हान दिले होते.

Ambadas Danve- Sanjay Shirsat News
Ambadas Danve News : हॉटेल व्हिट्स लिलाव प्रक्रियेवर अंबादास दानवे यांचा आक्षेप! कुंपणच शेत खात असल्याचा महसूल प्रशासनावर आरोप

उगाच माझी बदनामी करू नका, माझ्या मुलाबाळांवर आणि कुटुंबावर जाऊ नका. मी चक्रम माणूस आहे घराला आग लावायला ही कमी करणार नाही, अशा शब्दात शिरसाट यांनी आरोप करणाऱ्यांना इशारा दिला होता. त्यावर आज मुंबईत माध्यमांनी अंबादास दानवे यांना छेडले असता त्यांनी शिरसाट यांना टोला लागावला. जो माणूस ऑन रेकॉर्ड, कॅमेऱ्यावर मी चक्रम आहे घराला आग लावू शकतो, असे सांगतो असा वेडा, चक्रम माणूस राज्याच्या मंत्रिमंडळात नको.

Ambadas Danve- Sanjay Shirsat News
Sanjay Raut : भाजप आणि शिवसेनेने ठाकरे गटाला डॅमेज करायचेच ठरवले आहे... संजय राऊतांचा त्रागा त्याचमुळे !

उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या चक्रम माणसाने काही चक्रमपणा केला तर काय होईल? याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा. चक्रम आणि वेड्या माणसाला मंत्रिमंडळात ठेवू नका, अशी मागणी करणारे पत्र मी लवकरच राज्यपालांना देणार आहे, असे म्हणत अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांची खिल्ली उडवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com