Sanjay Raut : भाजप आणि शिवसेनेने ठाकरे गटाला डॅमेज करायचेच ठरवले आहे... संजय राऊतांचा त्रागा त्याचमुळे !

Sanjay Raut's anger at Girish Mahajan, BJP and Shinde group : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची नाशिकची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या खांद्यावर सोपवली आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावरच पक्षाला गळती लागली आहे.
Sanjay Raut,Eknath Shinde, Devendra Fadnavis
Sanjay Raut,Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची नाशिकची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या खांद्यावर सोपवली आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावरच पक्षाला गळती लागली आहे. शिवसेना शिंदे गट व भाजपकडून उबाठा गटाचे मोठ मोठे मासे गळाला लावण्याचे काम सुरु आहे. हे डॅमेज कंट्रोल करताना संजय राऊत यांना मात्र अपयश येत आहे, त्यातूनच राऊतांचा संताप वाढत जात आहे.

संजय राऊत नाशिकमध्ये असताना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय चर्चांणा उधाण आलं असतानाच आज बडगुजर यांनी पुन्हा एक धक्कादायक विधान केलं. माझ्यासह दहा ते बारा जण पक्षात नाराज आहे असं बडगुजर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बडगुजर यांच्या उघड नाराजीने राऊतांच्या ह्रदयाचे ठोके निश्चितच वाढले असतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सोमवारी शिवसेना उबाठाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला शिवसेना नेते व उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. त्यामुळे शिंदे यांच्याही पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळे शिंदे व बडगुजर असे दोन बडे नेते शिंदेंच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वाढली आहे. त्यांच्यासोबत इतरही काही माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करु शकता. त्यामुळे पक्ष वाचवण्याचं मोठं आव्हान आता संजय राऊत यांच्यापुढे आहे.

Sanjay Raut,Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde : शेवटी शिंदे- शिंदेंकडेच जाणार, एकनाथ शिंदेंच्या एका वाक्याने उद्धव ठाकरेंची झोप उडाली

त्यातच गिरीश महाजन यांनीही काही दिवसांतच ठाकरे गटाला मोठा धक्का बसेल असं विधान केलं. ठाकरे सेना जमिनदोस्त होणार असल्याचं गिरीश महाजन म्हणाले. त्याचवेळी संजय राऊतही गिरीश महाजन यांच्यावर भडकले आहेत. तुमच्या दहा पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. पक्ष फोडण्यासाठी भाजपने दलाल नेमले आहे, त्यातील पहिले दलाल गिरीश महाजन आहेत अशी टीका राऊत यांनी केली.

Sanjay Raut,Eknath Shinde, Devendra Fadnavis
Girish Mahajan : संजय राऊत जवळ असताना उद्धव ठाकरेंना अन्य शत्रूची गरज नाही, मंत्री महाजनांचा टोला

महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असतानाच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणाऱ्या नेते, पदाधिकाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. राऊत हे पक्ष वाचविण्यासाठी धडपड करत असताना शिंदे-फडणवीस दोघे मिळून एक-एक डाव टाकत असून त्यातून उबाठा पक्ष खिळखिळा होत आहे. नाशिकमध्येही शिंदे-फडणवीसांनी मोठं जाळं टाकलं आहे. त्यामुळे येत्या काळात उबाठात मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या गोष्टी पाहाता राऊतांचा त्रागा स्वाभाविक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com