Sanjay Shirsat On Chandrakant Khaire : 'मामू'नां विरोधाची चंद्रकांत खैरेंची भूमिका योग्यच, संजय शिरसाटही सहमत!

Political News : उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे दुसरे नेते अंबादास दानवे यांनी माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांना पक्षात आणले.
Chandrakant Khaire Sanjay Shirsat News
Chandrakant Khaire- Sanjay Shirsat NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेना पक्षातून फुटून बाहेर गेलेले पालकमंत्री संजय शिरसाट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यातून विस्तवही जात नाही. अनेकदा हे दोघेही एकमेकांवर तुटून पडल्याचे पहायला मिळाले. परंतु खैरे यांच्या एका भूमिकेला संजय शिरसाट यांनी चक्क पाठिंबा दर्शवला आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे दुसरे नेते अंबादास दानवे यांनी माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांना पक्षात आणले.

मातोश्रीवर गुपचूप त्यांचा प्रवेश करून घेतला. याला चंद्रकांत खैरे यांनी टोकाचा विरोध करत त्यांना उमेदवारी मिळू देणार नाही, असे म्हणत दंड थोपटले. चंद्रकांत खैरे यांचा हा आक्रमकपणा, मामूंच्या प्रवेशाला विरोध आणि दानवेंच्या एकाधिकारशाहीला आव्हान यावर संजय शिरसाट (Sanjay Shirsat) खूष झाले आहेत.

Chandrakant Khaire Sanjay Shirsat News
BJP leader Marriage : 'वयाचं बंधन तोडलं!' 63 व्या वर्षी भाजप नेत्याचं चौथं लग्न; 20 वर्ष लहान काँग्रेस नेत्याशी बांधली लग्नगाठ, नेटकरी थक्क!

केवळ मतांच्या लाचारीसाठी एखाद्याला पक्षात प्रवेश देणे चुकीचे आहे, अशावेळी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या सारख्या नेत्याला राग येणे सहाजिकच आहे. खैरे यांचा रशीद मामूला असलेला विरोध योग्यच असल्याचे म्हणत शिरसाट यांनी थेट खैरेंची बाजूच घेतली.

Chandrakant Khaire Sanjay Shirsat News
Shivsena UBT : ठाकरेंचा कोकणातील दुसराही नगराध्यक्ष फुटला? 'मातोश्री'वर न जाता थेट शिंदेंनाच भेटला, शिवसेनेत खळबळ

संजय शिरसाट हे उद्धव सेनेतील इतर नेत्यांवर टीका करतात, पण चंद्रकांत खैरे यांच्यावर टोकाची किंवा खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी कधी टीका केली नाही. उलट खैरे-दानवे यांच्या वादात खैरे यांची बाजू आणि त्यांनी शिवसेना वाढीसाठी घेतलेल्या कष्टाचे शिरसाट यांच्याकडून वेळोवेळी गुणगाण करण्यात आल्याचे दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून संभाजीनगरची उमेदवारी देण्याची आॅफरही संजय शिरसाट यांनीच खैरे यांना दिल्याचा गौप्यस्फोट केला होता.

Chandrakant Khaire Sanjay Shirsat News
Pimpri Chinchwad NCP: "लाडकी बहीण म्हणता अन् त्यांचीच इज्जत ठेवत नाहीत"; राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरुन पुण्यात महिलांचा राडा

आता अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांच्या पक्ष प्रवेशावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुरू असलेल्या वादात संजय शिरसाट यांनी उडी घेतली. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता मामू पक्ष झाल्याचा टोला लगावतानच शिरसाट यांनी खैरे यांनी या प्रवेशाला केलेल्या विरोधाला हवा देण्याचे काम त्यांची बाजू घेत केले आहे. अशा चुकीच्या निर्णयामुळेच त्या पक्षात आता कोणी थांबायला तयार नाही, सगळे पक्ष सोडून चालले आहेत, असे शिरसाट म्हणाले.

Chandrakant Khaire Sanjay Shirsat News
Congress leader death : काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला : महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com