Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : 'त्यांना' मतांची सूज आलीय; संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला

Shivsena UBT : दरवाजा उघड असे आम्ही त्यांना सांगितले नाही. आम्ही जाणार आणि ते आम्हाला घेणार, असे काही चित्र नाही.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : शिवसेनेतून फुटून गेलेल्या गेलेल्या गद्दारांना परतीचे दरवाजे बंद असल्याचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. ठाकरेंच्या या विधानाला शिंदे गटानेही सडेतोड उत्तर दिले. आम्ही जाणार आणि ते आम्हाला घेणार, असे कुठेही चित्र नाही. मात्र आमचे दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत, असा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाकरेंना दिला आहे.

शिरसाठ म्हणाले, दरवाजा उघड असे आम्ही त्यांना सांगितले नाही. आम्ही जाणार आणि ते आम्हाला घेणार, असे काही चित्र नाही. उलट शिंदे साहेबांचा दरवाजा अनेकांसाठी उघडा आहे. त्यामुळे ठाकरेंचेच अनेक जण आमच्याकडे येतील. आता त्यांना मतांची सूज आलेली दिसतेय. त्यांची अनेक मंडळी आमच्या संपर्कात आहे. त्यांना थांबवण्यासाठीच अशी विधाने ठाकरे करतात, असा निशाणाही शिरसाटांनी साधला.

उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी सांगितले की ते आमच्यातील कुणालाही परत घेणार नाहीत. पण त्यांच्याकडे जातेय तरी कोण, यादी त्यांनी यादी द्यावी. जिथे पाणी थांबत नाही, तिथे कुणी पाणी भरायला जात नाही. तुमच्याकडची लोक आमच्याकडे येतील. त्यांना सांभाळण्यासाठीच त्यांचा हा खटाटोप सुरू आहे. आता त्यांनी सरकार स्थापनेचे दावे करू नयेत. त्यांची महाविकास आघाडी टिकणार नाही, अशी टीकाही संजय शिरसाट यांनी केली.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Raksha Khadse : 36 चा आकडा असलेले नाथाभाऊ अन् गिरीश महाजन एकत्र येणार? रक्षा खडसेंचा नेमका प्लॅन काय?

दरम्यान, उद्योग मंत्री उदय सामंत, संजय शिरसाट Sanjay Shirsat आणि खासदार संदिपान भुमरे यांनी रुग्णालयात जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यावर काम सुरू आहे. हैद्राबाद गॅजेटसाठी गरज पडल्यास आम्ही हैद्राबादला जाऊ. भविष्यात त्यांना उपोषण आंदोलन करावे लागणार नाही याची काळजी घेऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Dattatray Bharne News : असं बनवलं आमदार दत्ता भरणेंना ‘मामा’; नेमकं काय घडलं...?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com