Jalgaon Political News : जिल्ह्यातील दोन मोठे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार, असा शब्दच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील दोन बडे नेते एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसे झाले तर उत्तर महाराष्ट्राचे राजकीय स्थिती बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रक्षा खडसे म्हणाल्या, नाथाभाऊ Girish Mahajan मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील. आणि योग्य वेळी नाथाभाऊंचा प्रवेश होईलच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टी सोबत जेवढे लोक जोडतील तेवढ्या आमच्या पक्षाची ताकद वाढेल. नाथाभाऊ हे भाजप मधील खूप जुने नेते आहेत. त्यामुळे गिरीशभाऊ आणि नाथाभाऊ यांनी एकत्र येऊन काम केले तर जिल्ह्याच्या विकासासाठी चांगलेच आहे, याकडेही रक्षा खडसेंनी लक्ष वेधले.
एकना खडसे Eknath Khadse आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. गेल्या चार-पाच वर्षांपासून या दोघांचा संघर्ष बघत आलेली आहे. परंतु या दोन ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र आले पाहिजे, अशी माझी देखील प्रामाणिक इच्छा आहे. मागील काळामध्ये हे नेते एकत्र होते, तेव्हा जळगाव जिल्ह्यासाठी खूप चांगले झालेले आहे, असेही त्या म्हणाल्या.
मागील काळात काही नाथाभाऊंच्या आणि काही गिरीश महाजन यांच्या चुका झालेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप केले. आता चांगली संधी आहे, हे आरोप प्रत्यारोप थांबून दोघांनी एकत्र आला पाहिजे. कारण गिरीश महाजन स्वतः मंत्री आहेत आणि जिल्ह्यात आता चार मंत्री आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर नक्कीच जिल्ह्याचा विकास होईल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.