Sanjay Shirsat : "मी हॉटेल व्हिट्सच्या खरेदी प्रक्रियेतून माघार घेतो; आता दम असेल तर..." शिरसाट यांनी बाहेर पडताना राऊत-दानवेंना दिलं चॅलेंज

व्हिट्स हॉटेलच्या वादग्रस्त खरेदी प्रक्रियेतून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी माघार घेतली आहे. 110 कोटींचे हॉटेल 68 कोटी रुपयांमध्ये खरेदी करत असल्याचा आरोप शिरसाट यांच्यावर होता.
Sanjay Shirsat Withdraws from VITS Hotel Purchase Deal
Sanjay Shirsat Withdraws from VITS Hotel Purchase DealSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Shirsat News : व्हिट्स हॉटेलच्या वादग्रस्त खरेदी प्रक्रियेतून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी माघार घेतली आहे. 110 कोटींचे हॉटेल 68 कोटी रुपयांमध्ये खरेदी करत असल्याचा आरोप शिरसाट यांच्यावर होता. यावेळी शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही टीका केली. तसेच "आता दम असेल तर हे हॉटेल तुम्ही खरेदी करून चालवून दाखवावं" असे आव्हानही दिले आहे.

संजय शिरसाट म्हणाले, मागील 10 दिवसापासून एक विषय चर्चेला येत आहे. माझा मुलगा संभाजीनगरमध्ये एक हॉटेल खरेदी करत आहे. त्या हॉटेलचे प्रकरण कोर्टात आहे. पण गेली अनेक वर्ष भागधारकांचा व्यवहार रखडलेला आहे. यापूर्वी 7 वेळा लिलाव प्रक्रिया पार पडली आहे. त्यावेळी कोणी हॉटेल घेतले नाही. आठव्या वेळी माझ्या मुलाने आणि त्याच्या मित्रांनी टेंडर भरले. त्यासाठी आवश्यक रक्कमही भरली. आता हे केल्यानंतर मूर्खासारखे काही जण स्टेटमेंट करत आहेत.

पण मुळात ज्यावेळी व्यवहार पूर्ण होईल त्यावेळी बोलायला पाहिजे होते. ज्यावेळी हॉटेल खरेदी होईल, त्यावेळी सगळा व्यवहार व्हाइटमध्ये दिसेल. शिवाय 110 कोटी हा आकडा कुठून आला? 68 कोटी रुपयांचा विषय आहे. आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घ्या. इतके पैसे आले कुठून या प्रश्नावर शिरसाट म्हणाले, 25 टक्के रक्कम लिलावात या पाच जणांनी मिळून भरली आहे. तर उर्वरित 75 टक्के रक्कम ही बँकेतून कर्ज स्वरुपात मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sanjay Shirsat Withdraws from VITS Hotel Purchase Deal
Sanjay Shirsat : 'म्हशीचा की रेड्याचा बळी!', राऊतांच्या टीकेवर संजय शिरसाटांसह गुलाबराव पाटीलही तुटून पडले

शिरसाट पुढे म्हणाले, संजय राऊतला ब्रिफिंग कुणी केले ते चुकीच आहे. केवळ संजय शिरसाट नाव येत आहे, त्यामुळे संजय राऊत यांनी बोंब मारायला सुरुवात केली आहे. पण संजय राऊत लक्षात ठेवा, मी थोडा चक्रम माणूस आहे. घराला आग लावायला कमी करणार नाही. उद्या माझा मुलगा या टेंडर प्रक्रियेतून बाहेर पडत आहे. व्यवसायासाठी उभ्या राहणाऱ्या व्यक्तीच्या कामात तुम्ही खोडा घातला आहे. मराठी माणूस उभा राहत होता. मात्र, तुम्ही ते होऊ दिले नाही. तुम्ही वैयक्तिक जात असाल तर मला सुद्धा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जावे लागेल. तुमच्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. मी सुद्धा सगळ्या गोष्टी काढेन, असा इशाराही शिरसाट यांनी राऊत यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com