Santosh Bangar News : युतीसाठी हात पसरण्याची गरज नाही, ते आपल्यामागे आले पाहिजे असे काम करा; संतोष बांगर यांनी घातले साकडे

Political News : ऐनवेळी सगळ्या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची वेळ आली तर? असा सवाल करत बांगर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परिस्थिती ओळखून असल्याचे सांगितले.
MLA Santosh Bangar
MLA Santosh BangarSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : शिवसेनेची ताकद मोठी आहे, आपापल्या भागात, मतदारसंघात असे काम करा, की युतीसाठी आपल्याला कोणासमोर हात पसरण्याची वेळ येता कामा नये. ते आपल्यामागे आले पाहिजे, असे आवाहन शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या संभाजीनगर येथील बैठकीत पदाधिकारी, शिवसैनिकांना केले.

मतदार याद्या दुरुस्ती एसआयआर संदर्भात काम करताना फक्त जिथे आपला आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, पंचायत समिती सभापती आहे, तिथेच काम करा, हे सांगणे बरे नाही. भविष्यात काय परिस्थिती ओढावेल हे सांगता येत नाही. त्यामुळे राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (shivsena) काम झाले पाहिजे. ऐनवेळी सगळ्या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची वेळ आली तर? असा सवाल करत बांगर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परिस्थिती ओळखून असल्याचे सांगितले.

MLA Santosh Bangar
Maharashtra Budget 2026 Live Update : ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची जरांगेंवर टीका, म्हणाले,'चिखला प्रकरणाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना....'

केवळ बीएलओवर जबाबदारी सोपवून काम होणार नाही. जिल्हाप्रमुख, स्थानिक नेत्यांनी यात लक्ष घातले तरच हे शक्य होईल. काटेकोरपणे काम करावे लागेल. आमदार, खासदार, मंत्री नेत्यांनी खालच्या पदाधिकाऱ्यांना ताकद दिली पाहिजे. हे सगळे लोक आपल्यासाठी रात्रंदिवस झेंडे उचलतात. आपल्याला आमदार, खासदार, मंत्री करण्यासाठी ते झटत असतात. पण आपण निवडून आलो की, कार्यकर्त्यांवर कधी हरळी फुटते हे कळत नाही. आपण रात्रंदिवस कार्यकर्त्यांना फोन करतो, पण निवडणूक झाल्यानंतर नेता, कार्यकर्त्याचा विचार करत नाही, असा घरचा आहेर बांगर यांनी बैठकीत दिला.

MLA Santosh Bangar
Shivsena UBT : खासदारांनी 'शॉक' देताच उद्धव ठाकरे पुन्हा 'ॲक्शन मोड'मध्ये; आता महाराष्ट्रातील पक्षवाढीसाठी रणनीती

वस्तुस्थिती बोलली पाहिजे, आपले मतदार दुसरीकडे वळत आहेत. आपल्याला काळजी घ्यावी लागले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वस्तुस्थिती माहित आहे. मा‍झ्या जिल्ह्यात तीनही नगरपालिकेवर भगवा फडकला आहे, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, पंचायत समिती, बाजार समितीवर करकरीत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकला आहे. आपल्या भागात असे काम करा, की त्यांना आपली गरज पडली पाहिजे, आपण त्यांच्याकडे युतीसाठी हात पसरण्याची गरज नाही, असे आवाहनही बांगर यांनी केले.

MLA Santosh Bangar
Shivsena UBT News : आधी नगरसेवक होईन, मगच लग्न; उद्धव ठाकरेंचा शिलेदाराला फोन, आता चांगली मुलगी बघ!

युवा सेनेची भूमिका यामध्ये महत्त्वाची असणार आहे. युवा सैनिकांनी घराघरात गेले पाहिजे. उमेदवार कोणी असला तरी तो निवडून येईल, असे काम आपल्याला करावे लागेल. कोणत्या नेत्यांची शिवसेना तयार होता कामा नये, ती फक्त बाळासाहेबांची आणि एकनाथ शिंदे यांची असली पाहिजे. काटेकोर, तंतोतंतपणे काम करा, तयारी अशी करा, की समोरचा नामोहरम झाला पाहिजे, अशा शब्दात बांगर यांनी उपस्थितांना सूचना दिल्या.

MLA Santosh Bangar
Shivsena UBT : उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये अस्वस्थता! ऑपरेशन टायगर होणारच; शिंदेंच्या मंत्र्याने दिले ओपन चॅलेंज

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com