Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना एका महिलेची छेड काढल्याचे सांगून मारहाण करण्याचा प्लॅन होता. त्यासाठी ती महिला देखील तयार झाली होती. मात्र, पुढे संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मकोका लावत मुख्य आरोपी करण्यात आले आहे. मात्र, ज्या महिलेची छेड काढल्याचा आरोप संतोष देशमुखांवर केला जाणार होता. त्याच महिलेची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत 'संतोष देशमुखावर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारकानगरमध्ये राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतय.', असे म्हटले आहे.
कुठल्या कारणाने हत्या झाली अन् बीड पोलिसांना ही बातमी कळाली अन ते घटना स्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलीसाना कळाली व अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतीक संबधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे, असे देखील आपल्या ट्विटमध्ये दमानिया यांनी म्हटले आहे.
'शहरातील द्वारकानगरीत राहणाऱ्या लोकांना दोन दिवसांपासून उग्र वास येत होता. पण ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला. मृतदेह सडलेला आसल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोष्टमार्टम केले व अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत
अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी मनीषा आकुसकर आडस, मनीषा बिडवे, कळंब, मनीषा मनोज बियाणी, कळंब , मनीषा राम उपाडे, अंबाजोगाई, मनीषा संजय गोंदवले, रत्नागिरी असा वेगवेगळ्या नावांचा वापर करत होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.