Walmik Karad Attack : मोठी बातमी! बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला मारहाण?

Walmik Karad Sudarshan Ghule Attacked : खोट्या आरोपाखाली वाल्मिक कराडने अडकवल्याची गीते गँगचा आरोप आहे. त्यातूनच गीते गँगकडून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर हल्ला करण्यात आला असावा.
walmik karad
walmik karadsarkarnama
Published on
Updated on

Walmik Karad News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीडच्या जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांकडून कारागृहात कराड आणि घुले यांना मारहाण झाली.

आपआपसांत जे वैर आहे, त्यांच्या ज्या टोळ्या आहेत त्यातून ही मारहाण झाली असावी, असे बोलले जात असतानाच टोळी युद्धामुळे ही मारहाण झाली असल्याची शक्यता अंजली दमानिया यांनी वर्तवली साम टिव्हीशी बोलताना वर्तवली आहे.

खोट्या आरोपाखाली वाल्मिक कराडने अडकवल्याची गीते गँगचा आरोप आहे. त्यातूनच गीते गँगकडून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर हल्ला करण्यात आला असावा. मात्र, या विषयी कारागृह प्रशासनाकडून मारहाणीबाबात कुठलेही वृत्त देण्यात आलेले नाही.

walmik karad
Walmik Karad Attack : मोठी बातमी! बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला मारहाण?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आठ आरोपींना बीडच्या जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याच जेलमधील दुसऱ्या बराकीमध्ये अक्षय आठवले, महादेव गीते यांना याला देखील ठेवण्यात आले आहे. अक्षयला मकोका अंतर्गत शिक्षा झाली आहे. तर, महादेव गीते हा परळीचा असून तो देखील याच जेलमध्ये आहे.

सकाळी नाष्ट्याच्या वेळी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि महादेव गीते हे समोरासमोर आले. पहिल्यांदा त्यांच्यात शा‍ब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर हाणामारी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मारहाण झाल्याच्या वृत्ताबाबत जेल प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा अद्यापर्यंत देण्यात आलेला नाही. कराड याने खोट्या गुन्हात अडकवल्याचा जाब गीते याने विचारत मारहाण केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

मागील पाच ते सात दिवासांपासून जेलमध्येच वाल्मिक कराड आणि महादेव गीते यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचे देखील सांगितले जाते. मात्र, आज सकाळापासून या वादावादीचे प्रमाण वाढून शा‍ब्दिक हल्ले सुरू झाले होते. त्यानंतर महादेव गीते आणि अक्षय आठवले हे वाल्मिक कराडवर चालून जात त्यांनी मारहाण केल्याची माहिती आहे.

walmik karad
Uddhav Thackeray Nashik Visit : संजय राऊतांचे खूप झाले दौरे, आता उद्धव ठाकरेच उतरणार नाशिकच्या मैदानात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com