Jitendra Awhad : बीडची सभा जितेंद्र आव्हाड यांनी गाजवली पण होतायेत भलतेच आरोप; 'त्या' स्क्रीनशाॅट मागील सत्य काय?

Rupali Thombare : आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, बीडचे रहिवाशी शिवराज बांगर यांच्यासोबतचे न केलेले चॅट माॅर्फ करून वायरल करण्यात आले.
Jitendra Awhad Rupali Thombare
Jitendra Awhad Rupali Thombaresarkarnama
Published on
Updated on

Jitendra Awhad News : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने महाराष्ट्र ढवळून निघालाय. आज बीडमध्ये आयोजित केलेल्या मूक मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांचे नाव घेत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. मात्र, यासभेनंतर जितेंद्र आव्हाडांचे व्हाॅट्सअप चॅटचे स्क्रिन शाॅट टाकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी गंभीर आरोप केले.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी टाकेलेल्या स्क्रिनशाॅटमध्ये 'उद्याचा मसाला रेडी ठेव शिवराज मी पहिली तुझी भेट घेईल नंतर मोर्चाकडे. मुंड्या विरोधात आणि वाल्याविरोधात जे जे असेल ते सर्व गोळा कर. पैसे लागले तर मला फोन कर पण मटेरियल तयार ठेव. तुझा फोन लागत नाही सकाळ पासून प्रयत्न करतोय.', असा उल्लेख आहे.

Jitendra Awhad Rupali Thombare
Anjali Damaniya : बीडमधील स्फोटक माहिती, व्हिडीओ कोण पुरवतंय; अंजली दमानियांनी दिले 'हे' उत्तर

या स्क्रिनशाॅटवरून जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटरवरून हे स्क्रीनशाॅट खोटे असल्याचे सांगितले आहे. तसेच रुपाली पाटील यांनी हे माझेच चॅटिग असल्याचं सिद्ध करून दाखवावं. जर त्यांनी सिद्ध केलं तर मी आमदारकीचा राजीनामा देईल. पण जर त्यांनी सिद्ध केलं नाही तर त्यांनी माफी मागावी,असे आव्हान दिले आहे.

आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, बीडचे रहिवाशी शिवराज बांगर यांच्यासोबतचे न केलेले चॅट माॅर्फ करून वायरल करण्यात आले. त्यात महत्वाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाच्या ॲड. रूपाली ठोंबरे यांची आहे. हास्यास्पद आहे की, एक ज्येष्ठ वकील असूनदेखील सत्य - असत्य न तपासता त्यांनी हा माॅर्फ केलेला चॅट वायरल केला. ३ वाजून ०७ मिनिटांनी भाषण संपले आणि ३ वाजून २६ मिनिटांनी हा चॅट या भूमीवर अवतरला.

पोलिसांत गुन्हा दाखल

मला समजतच नाही की, जर गुन्हा केलाच नाही तर एवढे अस्वस्थ का होतात? कर नाही तर डर कशाला? असो, बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. खेडकर यांना भेटून मी, संदीप क्षीरसागर, राजेश देशमुख, सातपुते आणि शिवराज बांगर यांनी गुन्हा नोंदविलेला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे.

बांगरवर दाखल गुन्हे हास्यास्पद

ज्या शिवराज बांगरचा चॅट दाखविला गेलेला आहे. तो शिवराज बांगरच्या कुटुंबियांना आयुष्यातून उद्ध्वस्त करण्यासाठी वाल्या कराडने जंगजंग पछाडले. शिवराज बांगर हा गरीब कुटुंबातील असल्याने पोलीसही त्याच्यावर पटापट गुन्हे नोंदवितात. सर्वात हास्यास्पद गुन्हा म्हणजे, शिवराज बांगर याने वाल्या कराडकडून खंडणी मागितली, आहे की नाही विनोद !, असे देखील आपल्या ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे.

Jitendra Awhad Rupali Thombare
Ashokrao Mane : हातकणंगलेच्या नव्या आमदारांनी भरला अधिकाऱ्यांना दम; वाहतूक कोंडीमुळे संतप्त

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com