Santosh Deshmukh Murder Case : बीडमध्ये ड्युटी, 'नको रे बाबा'; पोलिस अधिकाऱ्यांची आता बदलीसाठी 'फिल्डिंग'

Santosh Deshmukh murder case Beed police officers applied transfer : संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर बीड जिल्हा पोलिस दलाची कार्यपद्धती संशयात आल्याने अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केले आहेत.
Beed police
Beed police Sarkarnama
Published on
Updated on

Beed District Police Transfer : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारी चर्चेचा विषय बनली आहे. या घटनेनंतर बीड पोलिस दलातील काही अधिकारी आणि त्यांच्या कामगिरी देखील संशयाच्या भोवऱ्यात आली.

पोलिसांच्या कार्यपद्धतीकडे देखील त्याच नजेरतून पाहिले जाऊ लागले आहे. त्यामुळे बीड जिल्हा पोलिस दलातील अधिकारी अस्वस्थ असून, जिल्ह्यात नोकरी 'नको रे बाबा', असे म्हणत तब्बल 107 अधिकाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत.

बीड (BEED) जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याप्रकरण चांगलेच गाजर आहे. या प्रकरणात दोषारोपपत्र देखील न्यायालयात दाखल झाले आहे. या गुन्ह्यातील आरोपी अटकेत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निटकवर्तीय वाल्मिक कराड हा या हत्येचा कटात असल्याचा संशय आहे. त्यामुळे बीडमधील राजकीय गुन्हेगारी चर्चेत आली आहे.

Beed police
Narendra Modi on Mahakumbh : एकतेचा महाकुंभ; नरेंद्र मोदी म्हणतात...

गेल्या 88 दिवसांपासून बीड जिल्ह्यातील या हत्येच्या प्रकरणामुळे राज्य ढवळून निघाले आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे राजकीय करिअर यामुळे धोक्यात आले आहे. धनंजय मुंडे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात असेल, तरी याच हत्येच्या प्रकरणामुळे त्यांना बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची संधी हुकली. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यात जातीवाद वाढला आहे.

Beed police
Yogesh Kadam And Prakash Ambedkar : मंत्री योगेश कदमांच्या हकालपट्टीची मागणी; आंबेडकरांना आठवली बाबरी अन् शीख दंगल

या हत्येप्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा अटकेत असलेला निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा बीड जिल्हा बीड दलावर असलेला प्रभाव अजूनही चर्चेत आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवनीत कावत यांची नियुक्ती, हे सर्व काही सांगून गेली. नवनीत कावत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बीड पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी बराच प्रयत्न केला.

पोलिस अधिकाऱ्यांचे विनंती अर्ज

बीड जिल्ह्यात एकूण 29 पोलिस ठाणे आहेत. या पैकी 15 ठाणेदारांचा बदलीसाठी अर्ज आहे तर पोलीस अधीक्षक कार्यालयअंतर्गत असलेल्या विशेष शाखेपैकी सहा जणांनाचा विनंती अर्ज आहे. पोलिस महासंचालक यांच्याकडे 59 विनंती अर्ज तर छत्रपती संभाजीनगर विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे 48 विनंती बदली अर्ज आहेत.

अजितदादांचा सज्जड दम...

बीड जिल्ह्यात जवळपास 107 पोलिस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी बीड जिल्ह्या काम करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पसंती मिळत होती. पण आता अचानक बदलीसाठी विनंती अर्ज आल्याने बीड जिल्हा पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आला आहे. अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकत्व आहे, या हत्येच्या घटनेनंतर आणि अजितदादांनी पालकत्व स्वीकारल्यानंतर चुकीच्या गोष्टी खपवून घेर नसल्याचा सज्जड दम देखील दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com