

Beed News : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घृण हत्या प्रकरणात बचाव पक्षाने मागीतलेली डिजीटल पुराव्यांची प्रत अद्यापही मिळाली नसल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर आज (ता.6) शुक्रवारी पुरावे देण्याचे निर्देश न्यायालयाने अभियोग पक्षाला दिले. यावर हार्ड डिस्क ओपन होत नसल्याने फॉरेन्सिक एक्सपर्टकडून हा डेटा पेन ड्राइव्ह मध्ये देऊ, असे न्यायालयाला सांगण्यात आले.
तर, या प्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे याच्या लातूर कारागृहातून बीडच्या कारागृहात येण्याच्या मागणी अर्जावर आणि जयराम चाटे याच्या भावाचे निधन झाले असल्याने उत्तर कार्यासाठी त्याच्या तांबवा या गावी जाऊ देण्याच्या परवानगीच्या अर्जावर सरकार पक्षाकडून हरकत घेण्यात आली. पुढील सुनावणी 24 मार्चला होणार आहे. या सुनावणीत अभियोग पक्ष साक्षीदारांची यादी सादर करणार आहे.
नऊ डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे टाकळी फाटा जवळून अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. खुन प्रकरणासह अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागणी, याच कंपनीच्या मस्साजोग प्रकल्पावरील भांडण व तेथील दलित सुरक्षा रक्षकाला जातीवाचक शिवीगाळ या तीनही प्रकरणांची एकत्रित सुनावणी येथील विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पटवकदर यांच्या न्यायालयात सुरु आहे.
या प्रकरणात वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले, सुधीर सांगळे व फरार आरोपी कृष्णा आंधळे यांच्यावर कट करुन खुन, खंडणी, जातीवाचक शिवीगाळ केल्याचे आरोप निश्चित करण्यात आले. दरम्यान, विष्णू चाटे लातूरच्या कारागृहात तर उर्वरित आरोपी बीडच्या कारागृहात आहेत.
आरोपी महेश केदार याच्याकडून आता ऍड. विवेकानंद सानप यांचे वकीलपत्र तर वाल्मीक कराडचा सर्वोच न्यायालयाने जमीन अर्ज फेटाळण्याचे आदेश न्यायालयात सादर करण्यात आले. तर जयराम चाटे कडून कोर्टाला दुसरा अर्ज माझं वकील पत्र हे फक्त वाघीरकर वकिलांकडेच असेल, असा करण्यात आला. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकिल अॅड. उज्वल निकम व्हिसीद्वारे तर, विशेष सहाय्यक सरकारी वकिल अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली.
या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याने भाऊ वारल्याने उत्तरकार्यासाठी तांबवा येथे जाण्याची परवानगी मागणारा अर्ज केला. यावर सरकार पक्षाकडून ऍड. कोल्हे यांनी आक्षेप नोंदवला. अर्जासोबत मृत्यू प्रमाणपत्र नसून कुटुंबियांचे शपथपत्र देखील नाही. तसेच, संतोष देशमुख यांच्या हत्येचे ठिकाण केजजवळ असून तांबवा देखील केजजवळ आहे. त्यामुळे काही अनुचित बाब, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा मुद्दा मांडला. तर, यापूर्वी विष्णू चाटेने बीड कारागृहात येण्याच्या मागणीचा न्यायालयासमोर केलेला अर्ज खारीज झाल्याने नवीन अर्ज उचित नसल्याचे म्हटले.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आरोपी पक्षाकडून दिरंगाई केल्याचा मुद्दा आल्यानंतर यावर आरोपीच्या वकिलांकडून सरकारी पक्ष आम्हाला कागदपत्र देत नाही. सरकारी पक्षाकडूनच उलट यात दिरंगाई केली जात असल्याचे म्हणणे मांडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.