Dhananjay Munde Video : सुरेश धसांचे नाव घेत धनंजय मुंडेंचा पलटवार; वाल्मिक कराड कनेक्शन सांगून टाकले

Dhananjay Munde Valmik Karad Suresh Dhas : धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रि‍पदाचा कार्यभार संभाळला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख हत्ये प्रकरणात कोणीही दोषी असो त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असे म्हटले.
Dhananjay Munde Valmik Karad Suresh Dhas
Dhananjay Munde Valmik Karad Suresh Dhassarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण अधिवेशनात लावून धारले. वाल्मिक कराड यांचे नाव घेत त्यांना अटक करण्याची मागणी केली. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे जवळचे संबंधांवरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. मात्र, पहिल्यांदाच सुरेश धस यांचे नाव घेत धनंजय मुंडेंनी पलटवार केला आहे.

धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रि‍पदाचा कार्यभार संभाळला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख हत्ये प्रकरणात कोणीही दोषी असो त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असे म्हटले. तसेच सुरेश धसांच्या बाबत मोठा गौप्यस्फोट केला.

वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्यासोबत होती. माझ्या जवळचे ते आहेतच. त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्याची चौकशी पोलिस करतीलच, असे धनंजय मुंडे म्हणाले.

Dhananjay Munde Valmik Karad Suresh Dhas
Beed Crime News: बीडमध्ये 'गुंडा'राज, पोलिस चौकीसमोरच अंगाचा थरकाप उडवणारी घटना; चाकू अन् कोयत्यानं सपासप वार

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच पारदर्शक पद्धतीने तपास होत आहे. यामध्ये शासन कुणालाही पाठीशी घातल नाही. खूनाचे जे प्रकरण आहे ते भयंकर आहे. फास्ट ट्रेक कोर्टात हे प्रकरण चालले पाहिजे, असे देखील मुंडे म्हणाले.

माझा निर्णय अजितदादा घेतली

मुंडे म्हणाले,मंत्रि‍पदाची शपथ घ्यायच्या आधीपासून मिडिया ट्रायलमध्ये माझं नाव खराब करण्यासाठी सुरुवात झाली. मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर, विभाग कोणता मिळावा, कोणता मिळू नये यासाठी आणि त्यानंतर बीडचं पालकमंत्रीपद कोणी घ्यावं, कुणी घेऊ नये हा सर्व विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व अजितदादांकडे दिला आहे, असेही देखील मुंडे यांनी सांगितले.

Dhananjay Munde Valmik Karad Suresh Dhas
Beed Police action: बीड पोलिसांचा वाल्मिक कराडला पहिला दणका; हवेत गोळीबार करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com