Santosh Deshmukh : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट; CIDनंतर आता आणखी एक केंद्रीय यंत्रणा करणार तपास

Human Rights Commission will start inquiry Santosh Deshmukh Murder Case :संतोष देशमुख यांची हत्या ९ डिसेंबर रोजी करण्यात आली होती. त्यांचा खून आणि त्यांच्या देहाची केलेली विटंबना करण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder Case Sarkarnama
Published on
Updated on

संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना पूर्ण झाला आहे. पोलीस, सीआयडीच्या तपासाची चक्र वेगानं फिरत आहेत. अशातच आणखी एका मोठ्या संस्थेकडून या प्रकरणाचा तपास सुरु होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी तयारी सुरु झाली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपासासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या घटनेची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे. सोनवणे यांनी याबाबत मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक क्रानूगनो यांची भेट घेतली आहे.आयोगात तक्रार केली असून लवकरच आयोग चौकशीला सुरवात करणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

Santosh Deshmukh Murder Case
MVA Politics: महाविकास आघाडी फूटणार? कोल्हे-वडेट्टीवारांच्या हल्लाबोलनंतर राऊतांनी वात पेटवली! VIDEO पाहा

संतोष देशमुख यांची हत्या ९ डिसेंबर रोजी करण्यात आली होती. त्यांचा खून आणि त्यांच्या देहाची केलेली विटंबना ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने करावी अशी मागणी सोनावणे यांनी केली आहे.

Santosh Deshmukh Murder Case
PM Modi Podcast Video: पहिल्याच पॉडकास्टमध्ये मोदी म्हणाले, चुका माझ्याकडूनही होतात, मी काही देव नाही...,"

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात या प्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. दिल्लीहून आयोगाचे पथक बीडमध्ये तपासासाठी येणार आहे. राज्य सरकारकडून या प्रकरणाचा अहवाल मागवून मग तपास सुरु केला जाईल, असे म्हटले जात आहे, असे सोनवणे यांनी माध्यमांना सांगितले. संतोष देशमुख यांची हत्या ९ डिसेंबर रोजी करण्यात आली होती. त्यांचा खून आणि त्यांच्या देहाची केलेली विटंबना करण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राज्यातील विविध शहरामध्ये मोर्चे काढले जात आहेत. आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज स्मारकापासून या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर अंबड चौफुली येथे सभा झाली. मोर्चामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com