Santosh Deshmukh Case: 'संतोष देशमुख हत्येची केस मागे घेण्यासाठी ऑफर..?'; 13 महिन्यांनंतर जेलबाहेर आलेल्या धनंजय देशमुखांच्या साडूच्या दाव्यानं खळबळ

Beed Crime : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू असलेल्या धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर जवळपास तब्बल 13 महिन्यांची जेलवारी करुन नुकतेच बाहेर आले आहेत. याच खिंडकरांचं तुरुंगाबाहेर धूमधडाक्यात स्वागत झाल्याचं दिसून आलं होतं.
Walmik Karad, Dhananjay Deshmukh, Santosh Deshmukh
Family of murdered sarpanch Santosh Deshmukh reacts with relief after court rejects mastermind Walmik Karad's acquittal plea in the murder caseSarkarnama
Published on
Updated on

Beed News: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येनं बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्य हादरलं होतं. या संतोष देशमुख हत्येतील कृष्णा आंधळे सोडून वाल्मिक कराडसह सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. पण आता राज्याचं राजकारण तापवणारी हत्येची केस मागे घेण्यासाठी ऑफर देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू असलेल्या धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर जवळपास तब्बल 13 महिन्यांची जेलवारी करुन नुकतेच बाहेर आले आहेत. याच खिंडकरांचं तुरुंगाबाहेर धूमधडाक्यात स्वागत झाल्याचं दिसून आलं होतं. पण याच खिंडकरांनी आता संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

दादासाहेब खिंडकर म्हणाले, जुना व्हिडीओ व्हायरल करत मला खोट्या प्रकरणात फसवण्यात आलं, तो व्हिडीओ जुना आहे. पण याच प्रकरणाचा वापर संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबण्यासाठी करण्यात आल्याचंही खिंडकर यांनी म्हटलं. ज्या लोकांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं. त्याच लोकांनी गावात अनेक लोकांवर असे खोटे गुन्हे दाखल केले आहेत.

मला अडकवलेल्या याच आरोपींनी आत्तापर्यंत अनेकांना मारहाण केली आहे, पण पोलिसांत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हे सगळे लोक पैसे घेतात, नशा करतात आणि खोटे गुन्हे दाखल करतात. तसेच आपल्याला फसवलेल्या लोकांपाठीमागे मोठी राजकीय शक्ती असल्याचा दावा करुन खळबळ उडवून दिली आहे.

Walmik Karad, Dhananjay Deshmukh, Santosh Deshmukh
Jharkhand Elephant Attack: पिसाळलेल्या हत्तीनं भाजपच्या बड्या नेत्याला पायाखाली चिरडून मारलं; कुटुंबासह राज्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी बंधू धनंजय देशमुख हे पूर्ण ताकदीनिशी लढा देत आहेत. पण याचदरम्यान, त्यांचे साडू दादासाहेब खिंडकराविरोधात तरुणाला करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणात कारवाई करताना खिंडकरांना अटक केली होती.

तसेच यावेळी दादासाहेब खिंडकर म्हणाले की, आपण देशमुख कुटुंबासोबत कायम असून हा लढा सुरुच राहणार आहे. जीव गेला तरी संतोष देशमुख प्रकरणात माघार घेणार नसल्याचा निर्धारही खिंडकर यांनी बोलून दाखवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com