Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोषं देशमुख यांच्या हत्येला आता जवळपास सहा महिने उलटले आहेत.यानंतरही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे,तर इतर आरोपी तुरुंगात आहेत. तुरुंगात त्यांना व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोपही केला जात आहे. आता पुन्हा एकदा संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) कुटुंब आपला लढा तीव्र करणार असून संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
वैभवी देशमुखनं वडिलांचा खून, न्यायासाठी गावोगावी मोर्चे,आंदोलन, निषेध सभा, पोलीस अन् लोकप्रतिनिधींचे दौरे, गावातील घरासमोर दररोज भेटायला आलेली माणसं ह्या सगळ्या खडतर आणि दु:खद प्रसंगातही बाजी मारली. इयत्ता 12 वीच्या परीक्षेत 85.33 टक्के गुण मिळवत मोठं यश मिळवलं होतं.आता वैभवीनं वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमवार(ता.16)पासून रस्त्यावर बसत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतरही फरार असलेल्या आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी वैभवी देशमुख ही मस्साजोग येथे रस्त्यावर बसून आंदोलन करणार आहे. याबाबतचे निवेदन धनंजय देशमुख यांनी तहसीलदारांना देण्यात आलं आहे.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख आणि मस्साजोगचे समस्थ ग्रामस्थ हे संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा रस्तारोको आंदोलन करणार आहे. कृष्णा आंधळेच्या अटकेसह जे जेरबंद आरोपी आहेत त्यांना नगद आणि रसद पुरवणाऱ्यांची नावे जाहीर करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी यावेळी केली जाणार आहे.
यावेळी बीडमधील (Beed Crime )देशमुख कुटुंबियांनी याच आरोपींकडून आपल्याला धमकावलं आणि ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोपही धनंजय देशमुखांनी या निवेदनातून केला आहे. त्यामुळे केलेल्या मागण्यांची पूर्तता पोलिस प्रशासनाकडून कशाप्रकारे केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वडिलांच्या निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर असताना वैभवीने 12 वीची परीक्षा दिली होती. 12 वीच्या निकालानंतर वैभवीचे महाराष्ट्रभरातून कौतुक झाले होते. पण याचवेळी तिने माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत याचं दुःख आहे, अशी खंत व्यक्त केली होती.
माझ्या वडिलांचा अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आला होता, त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच एक आरोपी अद्यापही फरार आहे, त्याला देखील अटक केली जावे, अशी मागणी वैभवी देशमुखने केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.