Mumbai Elections: संकटांनी घेरलेल्या ठाकरेंसमोर नवं आव्हान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होणार 'RSS'ची एन्ट्री; असं फिरवणार राजकारण?

Mumbai Municipal Election : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एन्ट्री होणार आहे. संघ ज्या ज्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरतो तेव्हा भाजपला प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचं लपून राहिलेलं नाही.
RSS Devendra Fadnavis Uddhav Thackeray .jpg
RSS Devendra Fadnavis Uddhav Thackeray .jpgSarkarnama
Published on
Updated on

RSS News : लोकसभेला केंद्रातील भाजपला दणका दिल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपली चूक सुधारत भाजपसह महायुतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतलं. मग संघानेही झालं गेलं विसरुन जात भाजपसह महायुतीसाठी पूर्ण ताकदीनिशी जोर लावला. मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीला जे अभूतपूर्व यश मिळालं त्यात मोठा वाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) असल्याचं बोललं जातं. आता हाच संघ पुन्हा एकदा मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महायुतीतील भाजप,एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकरिता जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. यात विरोधी पक्षांतील दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात ओढण्यासाठी तीनही पक्षांनी गळ टाकण्यास सुरुवात केली आहे.

एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवीन राजकीय समीकरणं समोर येण्याची शक्यता आहे. कारण गेल्या दीड दोन महिन्यांपासून उद्धव आणि राज या दोन ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातून एक मोठी अपडेट समोर येत आहे.

महायुतीतील तीनही भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी रणनीती अद्यापतरी समोर आलेली नाही. तीनही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. त्यातही भाजप आणि एकनाथ शिंदेंनी आगामी 'मुंबई मिशन' चांगलंच मनावर घेतल्याचं दिसून येत आहे.

RSS Devendra Fadnavis Uddhav Thackeray .jpg
Bachchu Kadu Protest: मोठी बातमी! अखेर 7 दिवसांनंतर बच्चू कडूंचं एक पाऊल मागं; उपोषण स्थगित,पण मंत्री सामंतांना दमही भरला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एन्ट्री होणार आहे. संघ ज्या ज्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरतो तेव्हा भाजपला प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचं लपून राहिलेलं नाही. आता संघ मुंबईसाठी भाजपच्या मदतीला धावून येणार आहे. आता राष्ट्रीय स्वंयसेवक संघ भाजप की महायुती यांचा प्रचार करणार याबाबत जरी अद्याप स्पष्टता नसली तरी यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासाठी ही चिंता वाढवणारी नक्कीच असणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता मुंबईतील प्रत्येक प्रभागासह वॉर्डमध्ये बारकाईनं लक्ष घालणार आहे. आरएसएस आणि भाजपशी संलग्न अशा हिंदुत्ववादी संघटनांकडून पुढील दोन महिन्यांत मुंबईत अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या आयोजनातून हिंदु मतदारांना जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

RSS Devendra Fadnavis Uddhav Thackeray .jpg
Devendra Fadnavis Politics : राज–उद्धव मनोमिलनाला फडणवीस भेटीचा झटका ; युतीची चर्चाच थंडावली, कार्यकर्त्यांनीही घेतलं थांबून...

विधानसभा निवडणुकीतील अतिशय निराशाजनक कामगिरीनंतर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेतील एक एक महत्त्वाचे नेते शिंदे शिवसेना किंवा भाजपमध्ये दाखल होत आहे. काहीजण अजून वाटेवर आहेत. त्यामुळे एकापाठोपाठ एक धक्के सहन करत असलेल्या ठाकरेंसमोर आता आरएसएस तगडं आव्हान उभं करण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेवर इतकी वर्षे एकहाती सत्ता राखलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही निवडणूक आव्हानात्मक असणार आहे. कारण एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना मोठी फूट पडली आहे. या बंडानंतरची उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची ही पहिलीच महापालिका निवडणूक असल्यानं दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

RSS Devendra Fadnavis Uddhav Thackeray .jpg
BJP Vs Congress : भाजपचे ऑपरेशन महापालिका? काँग्रेसचे 30 माजी नगरसेवकांनाही फोडणार? 130 चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन

मुंबई महापालिका निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील ठाकरेंविरोधात मुंबईत उतरणार आहे. मुंबईत ठाकरेंना जोरदार धक्का देण्यासाठी संघ दक्ष झाला आहे. पण या आगामी निवडणुकीत संघ फक्त भाजपचा की संपूर्ण महायुतीच्या प्रचारासाठी झटणार आहे, याविषयी अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.

आता जरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपनं (BJP) महायुती म्हणून लढण्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक प्रमुख नेत्यांकडून केले जात असले तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची चाचपणी स्वबळाच्या दृष्टीनं सुरू असल्याचं बोललं जात आहे. पण मुंबई महापालिकेत शेवटच्या क्षणी महायुती म्हणून न लढता भाजपनं स्वबळाचा नारा दिला तर संघ शिंदे आणि अजित पवारांच्याही अडचणी वाढवण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याच अनुषंगानं मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये स्वयंसेवकांमार्फत संघ वॉच ठेवून असणार आहे. विधानसभेप्रमाणेच मु्ंबई महापालिकेत हिंदुत्वाच्या मुद्द्याभोवती राजकारण केंद्रीत करण्याची खेळी भाजप आणि संघाची असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com