Beed News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोपपत्रावर 19 रोजी होणार सुनावणी!

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्येप्रकरणी मकोका न्यायालयातील महत्त्वाची दोषारोपपत्र सुनावणी 19 डिसेंबरला होणार आहे. पुरावे आणि आरोपींच्या युक्तिवादामुळे प्रकरणाला नवे वळण मिळत आहे.
santosh deshmukh, ujjwal nikam
santosh deshmukh, ujjwal nikam Sarkarnama
Published on
Updated on

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घृण हत्या प्रकरणात अभियोग पक्षाकडून विशेष मकोका न्यायालयात सादर करण्यात आलेल्या व्हाईस रेकॉर्डिंगच्या पुराव्यावर अभियोग पक्ष आणि आरोपींच्या वकिलांमध्ये एक तास युक्तीवाद झाला. त्यामुळे आज अपेक्षित असलेली दोषारोपपत्र निश्‍चिती आता शुक्रवारी (ता. १९) होणाऱ्या सुनावणीत होणार आहे.

या प्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाकडून यापूर्वीच युक्तिवाद झालेला आहे. मात्र, त्याच्या वकिलांचा युक्तीवाद बाकी आहे. नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचे कासारी फाटाजवळून अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. यासह अवादा कंपनीला खंडणी तसेच याच कंपनीच्या मस्साजोग प्रकल्पावरील भांडण या तीन प्रकरणांचा एकत्रित तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाने केला.

यात वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे यांच्यावर आरोप ठेवण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी येथील विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पटवदकर यांच्या न्यायालयात सुरु आहे. खुनाच्या घटनेला वर्षे लोटून गेले तरी अद्याप आरोपींवर दोषारोपपत्र निश्‍चित झालेले नाही.

दरम्यान, मागच्या सुनावणीत (ता. 27 नोव्हेंबर) विशेष मकोका न्यायालयात या प्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णु चाटे याच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला. घटनेतील फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडत नसल्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील तपास यंत्रणांना विशेष मकोका न्यायालयाने दिल्या होत्या.

santosh deshmukh, ujjwal nikam
Beed Crime News : संतोष देशमुख हत्येचा धसका! बीडमध्ये पोलिसांचा भल्याभल्यांना दणका, 'या' कारवाईने गुन्हेगारांना भरली धडकी...

पुरावा, विलंबावरुन युक्तिवाद

दरम्यान, आजच्या सुनावणीत सरकारी पक्षाने निशाणी 100 नुसार अतिरिक्त पुरावा सादर केला. फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी दिलेला डेटा मोबाईलमधून लॅपटॉपमध्ये कॉपी केल्याचा आणि सरकारी पक्षाकडून वेळेवेळी नवीन सादर केलेले पुरावे आम्हाला मिळत नसल्याचा मुद्दा आरोपींच्या वकिलांनी मांडला. तर, आरोपींकडून जाणिवपूर्वक तारीख वाढवून खटल्याला विलंब केला जात असल्याचा मुद्दा सरकारी पक्षाच्या वकिलांनी मांडला.

santosh deshmukh, ujjwal nikam
Assembly Session : अधिवेशन सुरू असताना नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार, आमदार खोपडेंनंतर नितीन राऊत यांनाही धमक्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com