Jain Boarding Land Deal : जैन बोर्डिंग प्रकरणात मोठी अपडेट, बिल्डर गोखलेंची माघार; व्यवहार रद्द!

Jain Boarding Land Vishal Gokhale : जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या व्यवहारातून गोखले कंट्रक्शनने माघार घेत व्यवहार रद्द केल्याचे पत्र ट्रस्ट्रींना पाठवले आहे.
Jain Boarding
Jain Boarding sarkarnama
Published on
Updated on

Pune Jain Boarding : पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हा जमीन व्यवहार करणारे बिल्डर विशाल गोखले यांनी माघार घेत व्यवहार रद्द केला आहे. त्यांनी या ट्रस्टींना पत्र देऊन व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केली आहे.

जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणानंतर जैन समुदाय संतप्त झाला होता. जैन मुनींनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या जमीनीचा व्यवहार होऊ शकत नाही, असे ही जमीन देताना त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, तरी देखील ट्रस्ट्रींनी व्यवहार केला होता. यामध्ये राजकीय कनेक्शन असल्याचा देखील आरोप करण्यात येत आहे.

दोन दिवसांपूर्वी खासदार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेत या एक तारखेच्या आधी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वास देखील दिले होते.

नैतिकत भाव आणि सामाजिक परिस्थिती पाहून आपण या व्यवहारातून माघार घेत असल्याचे गोखले कंट्रक्शनने सांगितले आहे.तसेच विश्वस्तांनी घेतलेली व्यवहारातील रक्कम माघारी देण्याची विनंती केली आहे. तसेच व्यवहार रद्द करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता मी करेल, असे देखील त्यांनी सांगितले आहे.

Jain Boarding
Donald Trump Agriculture Policy: कृषी धोरणात तरी ट्रम्प नको! मोदी सरकारला सुप्रिया सुळेंचा टोकाच्या लढाईचा इशारा

लढा सुरूच राहणार...

खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले की, गोखले बिल्डरने एचएनडी जैन बोर्डिंग डिड रद्द करण्याचा निर्णय ट्रस्टींना कळवला आहे. तसचे ट्रस्ट्रींना व्यवहारासाठी दिलेली रक्कम परत मागितली आहे. मात्र, जोपर्यंत गोखले बिल्डरचे डिड रद्द होईन त्यांचे नाव कमी होऊन एचएनडी जैन बोर्डिंगचे नाव लागत नाही तो पर्यंत आमचा सढा सुरूच राहणार आहे.

Jain Boarding
Supriya Sule vs Sangram Jagtap : 'आता भडकावू भाषणासाठी येऊनच दाखवं, गाठ माझ्याशी'; सुप्रिया सुळेंचं आमदार जगतापांना थेट आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com