
New Delhi News : सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहण्यासाठी एक धाडसी पाऊल उचललं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) न्यायाधीश सर्वच न्यायाधीश हे स्वत:ची संपत्ती जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे (Delhi HIgh Court) न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात काही दिवसांपूर्वी कोट्यवधीची रोकड आढळून आली होती. त्यांच्या सरकारी बंगल्याला लागलेल्या आगीत जळालेल्या नोटा सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या समितीद्वारे वर्मा यांची चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश स्वत:ची संपत्ती जाहीर करणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वच न्यायाधीशांनी वैयक्तिक संपत्ती सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा निर्णय एक एप्रिल रोजीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वच न्यायाधीशांनी आपापल्या संपत्तीची माहिती सरन्यायाधीशांना दिल्यानंतर सरन्यायाधीशांसहित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या संपत्तीचा माहिती सार्वजनिक करणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश स्वत:ची संपत्ती जाहीर करणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वच न्यायाधीशांनी वैयक्तिक संपत्ती सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबता निर्णय एक एप्रिल रोजीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वच न्यायाधीशांनी आपापल्या संपत्तीची माहिती सरन्यायाधीशांना दिल्यानंतर सरन्यायाधीशांसहित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या संपत्तीचा माहिती सार्वजनिक करणार आहे.
यात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. ज्या न्यायाधीशांकडून मालमत्तेची माहिती सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आली आहे.त्यांच न्यायाधीशांची नावे सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहेत.यात सरन्यायाधीश संजीव खन्ना,न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती अभय.एस.ओका, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई,न्यायमूर्ती सूर्यकांत,न्यायमूर्ती बी.वी.नागरत्ना, न्यायमूर्ती जे.के.माहेश्वरी यांच्यासह इतर न्यायमूर्तींचाही यात समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाती एकूण 34 न्यायाधीश आहेत.त्यात एक पद रिक्त असून 30 न्यायाधीशांनी आपापल्या संपत्तीची माहिती न्यायालयाकडे सादर केली आहे.मात्र,काही न्यायाधीशांची संपत्तीची माहिती अद्यापही न्यायालयाकडे सादर झालेली नाही.पण याचवेळी दिलेल्या संपत्तीची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात 14 मार्च 2025 रोजी भीषण आग लागली होती. ती विझविण्यासाठी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना कोट्यवधीची रोकड निर्दशनास आली होती. ही रोकड नेमकी कुठून आली, यासाठी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी तीन सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. यानंतर भ्रष्टाचारासंबंधीचे उलटसुलट आरोप सुरू आहे. त्याचमुळे सर्व न्यायाधीशांनी आपापली संपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.