Imtiaz Jaleel On Nitesh Rane : नितेश राणे वायफळ बडबड करणारा मंत्री! मटनाचा धंदा पारंपारिक, त्यात कशाला पडता..

Imtiaz Jaleel criticizes Nitesh Rane for his irrelevant remarks and advises him to stay away from the mutton business. : मटन, कबाब, मटन कुर्मा, चिकन लाॅली पाॅप नितेश राणे यांना खूप आवडते. ते त्यांनी खावे, मटनाच्या धंद्यात डोक घालू नये. तुमच्या सर्टफिकेट वाटल्याने या व्यवसायावर काहीही परिणाम होणार नाही.
Nitesh Rane-Imtiaz Jaleel News
Nitesh Rane-Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : हिंदू मटन विक्रेत्यांना मल्हार प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचा आणि ते पाहूनच मटन खरेदी करण्याचे आवाहन करणारे मंत्री नितेश राणे यांच्यामुळे नव्या वादाला सुरूवात झाली आहे. एमआयएमने राणे यांच्या निर्णयावर टीका करताना मटनाचा धंदा हा पारंपारिक व्यवसाय असल्याने राणेसाहेब तुम्ही यात पडू नका, असा सल्ला प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

मटन, कबाब, मटन कुर्मा, चिकन लाॅली पाॅप नितेश राणे यांना खूप आवडते. ते त्यांनी खावे, मटनाच्या धंद्यात डोक घालू नये. तुमच्या सर्टफिकेट वाटल्याने या व्यवसायावर काहीही परिणाम होणार नाही. खाटीक, मटन विक्रीचा व्यवसाय हा पिढ्या आणि पंरपरेनूसार सुरू असताना यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. नितेश राणे यांनी आतापर्यंत केलेली विधान बघितली तर त्यांच्या या नव्या निर्णयाचे आश्चर्य वाटणार नाही, असा टोलाही इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी लगावला आहे.

आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झालेलं आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व शंभर टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल. विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल, कुठेही मटणामध्ये भेसळ झालेली आढळणार नाही, असे 'एक्स'वर पोस्ट करत मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या विषयाला हात घातला.

Nitesh Rane-Imtiaz Jaleel News
Nitesh Rane Vs Vaibhav Naik : मंत्री राणे स्वतः ला डॉन समजतात, अन् पोलिसांच्या चार-चार गाड्या घेऊन फिरतात; वैभव नाईकांनी थेट टार्गेट केलं

मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये असे आवाहनही राणे यांनी केले होते. या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असा दावा त्यांनी केला होता. यावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत इम्तियाज जलील यांनी राणे यांची खिल्ली उडवली. कुठला मुद्दा सापडला नाही, की नितेश राणे हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करतात.

Nitesh Rane-Imtiaz Jaleel News
Imtiaz Jaleel On Abu Azmi : अबू आझमींच्या निलंबनाची कारवाई मला मान्य नाही! इम्तियाज जलील संतापले

मटन तुम्हाला आवडते ते खुशाल खा, आम्हालाही खाऊ द्या, ते कुठून खरेदी करायचे, सर्टफिकेट पाहून करायचे की तसेच? याचा निर्णय लोकांना घेऊ द्या. तसेही मटन विक्रीच्या व्यवसायात तुमच्या समाजाचे लोक नसतात, मग कशाला उगाच दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा उद्योग करता, असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला. तुमच्या सर्टफिकेट वाटण्याचा काही परिणाम होईल, असे वाटत नाही.

Nitesh Rane-Imtiaz Jaleel News
Nitesh Rane News : 'हिम्मत असेल तर रत्नागिरीमध्ये जाऊन बोलून दाखवा', राणेंचं थेट आव्हानंच

नितेश राणे हे वायफळ बडबड करणारे मंत्री आहेत. मंत्री झाल्यापासून त्यांनी केलेली विधाने पाहिली तर ती हिंदू-मुस्लिम या दोन समाजात द्वेष पसरवण्याचे काम करणारी होती. आताही त्यांच्याकडे कुठलाच मुद्दा नसल्याने त्यांनी मटन विक्रीचा मुद्दा हाती घेतल्याचे दिसते. पण राणे यांच्या या सर्टफिकेट वाटप करण्याच्या निर्णयाचा काही परिणाम विक्रेते आणि मटन खाणाऱ्यांवर होणार नाही, असेही इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com