Satish Chavan News : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने संभाजीनगरमध्ये कात टाकली; नेतृत्व बदलताच जिल्ह्यात पक्ष दुसऱ्या क्रमांकावर!

Satish Chavan political news : नेतृत्व बदलल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने संभाजीनगर जिल्ह्यात मोठी झेप घेत पक्ष दुसऱ्या क्रमांकावर पोहोचवला.
Satish Chavan Politics
Satish Chavan Politics Sarkarnama
Published on
Updated on

NCP Victory In Chhatrapati Sambhajinagar : नगरपालिका, नगरपंतयात निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निकाल हे सगळ्याच राजकीय पक्षांना न्याय देणारे ठरले. सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्षालाही मतदारांनी पसंती दर्शवली. पाटी कोरी राहिली ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, एमआयएम, वंचित आघाडी या पक्षांची.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही संघटनात्मक बदल केले. विधानसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांच्या पक्षात जाऊन पराभवानंतर पुन्हा घरवापसी केल्यानंतर अजित पवारांनी मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवला. कैलास पाटील यांना हटवून जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी चव्हाण यांच्या खांद्यावर टाकली आणि पक्षाने जिल्ह्यात कात टाकली.

Satish Chavan Politics
Sandeep Kshirsagar : आमदार संदीप क्षीरसागरांचा बीडमध्ये 'स्ट्राईक रेट' घसरला; एमआयएमचा पतंगही उडाला नाही!

नगरपालिका निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला त्यात गंगापूरचे नगराध्यक्ष पदासह सत्ता आणि जिल्ह्यात 74 पैकी 38 नगसेवक निवडून आणत राष्ट्रवादीने चांगला स्ट्राईक रेट राखला. जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष मोठा भाऊ, तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर लहान भावाच्या भूमिकेत समोर आला आहे. आम्हीच नंबर वन म्हणणाऱ्या भाजपची घसरण मात्र तिसऱ्या स्थानावर झाली आहे. अजित पवारांचा जिल्ह्याचे नेतृत्व सतीश चव्हाण यांच्यावर सोपवण्याचा निर्णय कमालीचा यशस्वी ठरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

जिल्हाध्यक्ष आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या 74 पैकी 38 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवल्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील जागा वाटपात पक्षाची दावेदारी वाढणार आहे. गंगापूर, खुलताबाद व कन्नड नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीने आपले उमेदवार उभे केले होते. यामध्ये गंगापूर नगर परिषदेत संजय जाधव यांनी 2252 मतांनी विजय मिळवत सत्ताधारी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना झटका दिला.

तर जिल्ह्यातील एकूण 160 नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीने 74 उमेदवार उभे केले होते. यामध्ये गंगापूर नगर परिषदेत 20 पैकी 11, खुलताबादमध्ये 20 पैकी 9, कन्नडमध्ये 20 पैकी 12, वैजापूरमध्ये 9 पैकी 4, पैठणमध्ये 2 पैकी 2 अशा एकूण 38 जागांवर राष्ट्रवादीच्या घड्याळाने बाजी मारली. कन्नड व खुलताबादमध्ये नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष निवडून आले नसले तरी कन्नडमध्ये सर्वाधिक 12 तर खुलताबादमध्ये सर्वाधिक 9 उमेदवार हे विजयी झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी नंबर वनचा पक्ष ठरला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी उभा राहिला आहे, हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्ष पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून जे कार्यकर्ते पक्षापासून दुरावले होते त्यांच्यासह विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षात आणत सतीश चव्हाण यांनी नव्याने संघटनात्मक बांधणी केली. या सगळ्याचा परिणाम कालच्या निकालातून समोर आला आहे.

Satish Chavan Politics
Beed Election : मैदान मारलं! 'त्या' काट्याच्या लढतीचा थरारक निकाल; नाईकवाडेंनी असा पलटवला डाव!

जिल्ह्यातील विविध नगर परिषदांमध्ये तेथील जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून आमच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले आहे. त्यांनी दाखवलेला विश्वास आम्ही विकास कामांच्या माध्यमातून नक्कीच सार्थ ठरवू असा विश्वा आमदार सतीश चव्हाण यांनी विजयानंतरच्या प्रतिक्रियेतून दिला आहे.

अशी आहे जिल्ह्यातील स्थिती

जिल्ह्यातील एकूण 160 नगरसेवकांपैकी शिंदेसेनेचे 55, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 38, भाजपचे 37, काँग्रेसचे 18, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 1 तर अपक्ष 2 नगरसेवक निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com