Abdul Sattar News : मंत्रीपदावर टांगती तलवार, तरी सत्तार जोरात ; एमआयडीसीच्या भूसंपादनाला मंजुरी...

Sillod MIDC : सातशे हेक्टरच्या भूसंपादनाला मान्यता मिळाल्याने आता एमआयडीसीच्या कामाला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे.
Minister  Abdul Sattar News
Minister Abdul Sattar News Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada : सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले आणि तेवढेच वादग्रस्त ठरलेले राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार जोमात आहेत. सिल्लोड-सोयगांव या आपल्या मतदारसंघात एमआयडीसी आणल्यानंतर आता त्यासाठीच्या सातशे हेक्टर जागेच्या भुसंपादनाला मंजुरी मिळाली आहे. (Abdul Sattar News) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नुकतीच भूसंपादनाला मंजुरी दिली आहे.

Minister  Abdul Sattar News
Shivsena On Prakash Ambedkar News : आंबेडकरांच्या `औरंगजेब कबर` भेटीवर ठाकरे गटाचे मौन ?

राज्यातील तापलेले राजकीय वातावरण, अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना विरोधकांनी घेरत त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची लावून धरलेली मागणी या पार्श्वभूमीवर ते बॅकफुटवर जातील अशी चर्चा होती. (Marathwada) मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी मतदारसंघातील प्रस्तावित कामाना वेग देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सत्तार यांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार असल्याचे बोलले जाते.

नव्या मंत्रीमंडळ विस्तारात सत्तार यांना डच्चू दिला जाऊ शकतो, अशी देखील चर्चा आहे. मात्र त्याची फारशी चिंता न करता सत्तारांनी सिल्लोड येथील मंजुर एमआयडीसीच्या कामाला वेग देण्यास सुरुवात केली आहे. (Shivsena) एमआयडीसीसाठी ३०० हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने मंजुरी दिली आहे.

तसेच औद्योगिक क्षेत्राची सुसाध्यता व सलगता यासाठी उर्वरित वाढीव ४०० हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनास देखील तत्वतः मान्यता दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चधिकार समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिल्लोड येथे एमआयडीसीच्या उभारणीसाठी अब्दुल सत्तार यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.

सातशे हेक्टरच्या भूसंपादनाला मान्यता मिळाल्याने आता एमआयडीसीच्या कामाला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एमआयडीसीला मंजुरी मिळाली, त्याअनुषंगाने सिल्लोड येथील एमआयडीसीसाठी तालुक्यातील मौजे रजाळवाडी, मोढा बुद्रुक, मंगरूळ व डोंगरगाव येथील एकूण १ हजार १६ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते. यापैकी पहिल्या टप्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ७०० हेक्टर क्षेत्रास मान्यता दिली.

Minister  Abdul Sattar News
Vanchit Bahujan Aghadi Camp News : निमित्त शिबीराचे, पण औरंगजेब कबर, भद्रा मारोतीला भेट देत आंबेडकरांनी उडवला धुराळा..

सिल्लोड तालुका हा बेरोजगारी तसेच आत्महत्याग्रस्त तालुका असल्याने येथे एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग सुरू करणे गरजेचे होते. भूसंपादनास मंजुरी मिळाल्याने आता एमआयडीसी उभारणीला वेग येणार आहे. या एमआयडीसीच्या माध्यमातून जवळपास १० हजार बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. एमआयडीसीच्या अनुषंगाने येथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जालना येथे ड्रायपोर्ट, चिकलठाणा विमानतळ, रेल्वेस्टेशन अशा दळणवळणाच्या सुविधा असल्याने येथे उद्योग सुरू करण्यासाठी अनेक उद्योजक उत्सुक असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com