Ajit Pawar : सत्तार दोन तास आमच्यासोबत होते, पण सुरतला चाललो हे बोलले नाही..

आमच्याकडे असतांना अब्दुल सत्तार हे फार बोलायचे, पण गेल्या १२ दिवसांपासून ते काहीच बोलले नाही याचे आश्चर्य वाटते. ( Ajit Pawar)
Ncp Leader Ajit Pawar-Abdul Sattar
Ncp Leader Ajit Pawar-Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : नेहमी मोठ्या उत्साहाने बोलणारे अब्दुल सत्तार सध्या गप्प आहेत. बिर्याणी खायला आलो एवढेच बोलले, पण बिर्याणीही खाल्ली नाही. सुरतला जाण्याआधी दोन तास माझ्या आणि जयंतरावांच्या सोबत आमच्या दालनात सत्तार होते, पण सुरतला चालल्याचे बोलले नाही, अशा शब्दात अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोर आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना चांगलेच चिमटे काढले. कदाचित मंत्रीमंडळाची यादी अजून तयार झालेली नाही, म्हणून ते गप्प असतील, असा टोला देखील त्यांनी लगावला.

विधानसभेत आज शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध केले. १६४ विरुद्ध ९९ मतांनी शिंदे सरकार बहुमताच्या परीक्षेत पास झाले. (Marathwada) त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलतांना अजित पवार यांनी काल प्रमाणेच आज देखील जोरदार फटकेबाजी केली. (Maharashtra) मुख्यमंत्र्यांसह आता त्यांच्या सोबत गेलेल्या अनेक मंत्र्यांवर त्यांनी आसूड आढले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांच्यावर आज अजित पवारांना निशाणा साधला. अजित पवार म्हणाले, आमच्याकडे असतांना अब्दुल सत्तार हे फार बोलायचे, पण गेल्या १२ दिवसांपासून ते काहीच बोलले नाही याचे आश्चर्य वाटते. सुरतमध्ये बसमधून उतरतांना ` बिर्याणी खायला चाललो`, एवढंच म्हणाले होते. पण बिर्याणी देखील खालल्ली नाही.

Ncp Leader Ajit Pawar-Abdul Sattar
बंडखोरांचे पुतळे जाळणाऱ्या संतोष बांगरांनी मतदान करताच शिंदे गटाचा जल्लोष

तेव्हापासून ते गप्प आहेत, काहीच बोलत नाहीत. गमंत म्हणजे सुरतला जाण्याच्या दोन ता आधी ते माझ्या आणि जयंत पाटलांशी बोलले, चर्चा केली आणि लगेच सुरतला गेल्याचे ऐकायला मिळाले. ते गप्प आहेत कदाचित शिंदे मंत्रीमंडळात स्थान मिळते की नाही याची ते वाट पाहत असतील, असा चिमटाही पवार यांनी काढला आणि सभागृहात एकच हशा पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com