मुंबई : विधानसभेतील आज बहुमत चाचणीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला . आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) आज शिंदे गटात सामील झाले. यामुळे शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा आकडा ४० झाला आहे. संतोष बांगर हे हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. (Santosh Bangar latest news)
शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे. शिंदे सरकारला 164 मते मिळाली आहेत. विरोधात ९९ मते पडली. आजच शिंदे गटाच दाखल झालेले शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी बहुमताच्या बाजूने मतदान करताच सेना आमदारांनी घोषणा दिल्या.
रविवारी (3 जुलै) विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत संतोष बांगर यांनी शिवसेनेचे उमेदवार आमदार राजन साळवी यांच्या बाजूनं मतदान केलं होतं. विधानपरिषद निवडणुकीनंतर ज्यावेळी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केली, त्यावेळी या बंडखोर आमदारांवर संतोष बांगरांनी टीका केली होती. कळमनुरी या त्यांच्या मतदारसंघात जाऊन बंडखोर आमदारांचे प्रतिकात्मक पुतळेही जाळले होते.
राज्याचे माजी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, व कॉग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे वेळेत विधानभवनात पोहचू शकले नाही, त्यामुळे त्यांना बहुमत चाचणी उपस्थित राहता आले नाही. ते शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीस मुकले. हे दोन्ही आमदार वेळेत न पोहचू शकले नाहीत. सभागृहाचे दार बंद झाल्याने त्यांना बहुमत चाचणीस सभागृहात उपस्थित राहता आले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.