

Maratwhada News : कोरोना आणि त्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होणार आहे. (Save also said, municipal election in October) गेल्या महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विधान केले होते. त्यानंतर आज सहकारमंत्री अतुल सावे यांनी देखील येत्या ऑक्टोबरमध्ये महापालिकेची निवडणूक होणार असल्याचे सांगितले.
महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीनंतर पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर चार महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, असेही सावे (Atul Save) यांनी सांगितले. महापालिकेत आयोजित पंतप्रधान अवास योजनेच्या बैठकीत सावे बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशभरात प्रकल्प पूर्ण झाले असून, फक्त छत्रपती संभाजीनगर महापालिकाच मागे आहे.
महापालिकेचे आयुक्त बदलताच धोरण बदलते का ? वारंवार निर्णय न बदलता तातडीने आवास योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण करून पहिले सात हजार घरांचा प्रकल्प पूर्ण करा, अशी सूचना देखील सावे यांनी बैठकीत महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांना दिली. (Aurangabad) आवास योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू झाले पाहिजे, कारण आगामी काळ आचारसंहितेचा राहणार आहे.
ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणूका होतील, त्यानंतर फेब्रुवारीत लोकसभा व चार महिन्यानंतर विधानसभा निवडणूका लागतील, असे सावे यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे खरेच महापालिकेच्या निवडणुका होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू करा, असे आदेश शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांना वरिष्ठांकडून आल्याची चर्चा असतांनाच आता मंत्री सावे यांनी देखील या संदर्भात विधान केले. त्यामुळे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात महापालिका निवडणुकीचा बार उडणार एवढे मात्र निश्चित.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.