ध्वजारोहणासाठी भुमरे येताच; शिवसेना नेत्यांनी फिरवली पाठ

Shivsena| Aurangabad Politics| शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात मोठी बंडखोरी झाली.
Aurangabad Politics|
Aurangabad Politics|
Published on: 
Updated on: 

औरंगाबाद : भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त  येथील विभागीय आयुक्त कार्यालयमध्ये सोमवारी (ता. १५)  ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाची जबाबदारी मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे होती. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मंत्री संदिपान भुमरे ध्वजारोहण करण्यासाठी आले असता शिवसेनेचे (Shivsena) नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे व माजी महापौर नंदकुमार घोडेले हे आपल्या आसनावरून उठले  नाहीत. त्यांनी भुमरे यांच्याकडे बघितलेही नाही. ध्वजारोहण झाल्यानंतर नागरिकांना भेटण्यासाठी मंत्री येताच दोघांनी काढता पाय घेतला. 

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात मोठी बंडखोरी झाली. तब्बल पाच आमदार शिंदे गटात गेले तेव्हापासून उद्धव ठाकरे व शिंदे गटात संघर्ष सुरू आहे. सोमवारी याचे पडसाद सोमवारच्या ध्वजारोहण कार्यक्रमात उमटले. औरंगाबादच्या ध्वजवंदनाची जबाबदारी संदीपान भुमरे यांच्याकडे देण्यात आली होती. या कार्यक्रमात शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांनी भुमरेंचे तोंडही पाहिले नाही.

Aurangabad Politics|
Mukesh Ambani| अंबानी कुटुंबाला धमकी देणाऱ्याला अटक

सकाळी येथील विभागीय आयुक्त कार्यालयमध्ये ध्वजारोहण  करण्यात आले. भुमरे ध्वजारोहण करण्यासाठी आले असता चंद्रकांत खैरे व नंदकुमार घोडेले हे आपल्या आसनावरून उठले  नाहीत व मंत्र्यांकडे त्यांनी बघितलेही नाही. तसेच ध्वजारोहण झाल्यानंतर नागरिकांना भेटण्यासाठी मंत्री येताच खैरे व घोडेले यांनी काढता पाय घेतला. ते आले म्हणून आम्ही निघालो, असे खैरे जाताना म्हणाले.

याबाबत बोलताना संदीपान भुमरे म्हणाले की, ‘सच्चा शिवसैनिकाला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं हे महत्वाचं. जो काम करतो तो नाराज राहत नाही, मी नाराज राहू शकत नाही. पण खासदार चंद्रकात खैर हे न भेटताच निघून गेले. हा त्यांचा मोठेपणा. यावर त्यांनीच बोललं पाहिजे. त्यांना काही काम असेल त्यामुळे गेले असावेत. अनेक वर्षानंतर प्रतिक्षेनंतर स्थानिक माणसाला ध्वजारोहणाची संधी मिळाली ती फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच. मी सर्व देशबांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com