Jitendra Awhad Beed Speech: '' शरद पवारांना धनंजय मुंडेंना पक्षात घ्यायचंच नव्हतं, त्यांनी गोपीनाथ मुंडेंना...'' ; आव्हाडांचा गौप्यस्फोट

Jitendra Awhad On Dhananjay Munde: '' सत्ता आली काय आणि गेली काय शरद पवारांना याचा फरकच पडला नाही..''
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

NCP Beed Political Rally: बीडकरांसमोर खरे आणि खोटे करायला आलो आहे. आमच्या पक्षातून गेलेले एक ओबेसी नेते सांगतात, की पवारसाहेबांनी मुंडेसाहेबांचे घर फोडले. पण मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, त्यावेळी मी शरद पवारांसोबत होतो. त्यावेळी साहेबांनी एक वर्ष पंडीत मुंडे. आणि धनंजय मुंडेंना थांगपत्ता लागू दिला नव्हता. साहेबांना त्यांना पक्षात घ्यायचेच नव्हते. आणि त्या मतावर ते ठामही होते.

साहेब त्यांना नाही म्हणत होते. मी खोटं बोलत नाही. शरद पवारांनी त्यावेळी गोपीनाथ मुंडेंनाही फोन केला होता की, घर फुटतंय, घर सांभाळा. पण राक्षसी महत्वकांक्षा साहेब रोखू शकत नव्हते आणि नाईलाज झाला आणि पक्षात त्यांना स्थान देण्यात आले असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Jitendra Awhad
Sandeep Kshirsagar Mimicry: संदीप क्षीरसागरांनी पुन्हा केली धनंजय मुंडेंची नक्कल; म्हणाले, ‘कुणाचाही नाद करा; पण....’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची अजित पवार गटाते नेते आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये सभा होत आहे. या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर तुफानी हल्ला चढविला. य़ा सभेला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार फौजिया खान, आमदार रोहित पवार, अनिल देशमुख, राजेश टोपे, आमदार संदीप क्षीरसागर हे नेते उपस्थित होते.

आव्हाड म्हणाले, आज ओबीसींचे एक नेते बाहेर येऊन सांगतात की, शरद पवारासाहेबांनी मुंडेंचे घर फोडले. पण आता मी बीडकरांसमोर खरे आणि खोटे करायला आलो आहे. आमच्या पक्षातून गेलेले एक ओबेसी नेते सांगतात, की पवारसाहेबांनी मुंडेसाहेबांचे घर फोडले. पण मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, त्यावेळी मी शरद पवारांसोबत होतो. त्यावेळी पवारांनी एक वर्ष पंडीत मुंडे आणि धनंजय मुंडेंना थांगपत्ता लागू दिला नव्हता.

साहेबांना त्यांना पक्षात घ्यायचेच नव्हते. आणि त्या मतावर ते ठामही होते. साहेब त्यांना नाही म्हणत होते. पण राक्षसी महत्वकांक्षा साहेब रोखू शकत नव्हते आणि नाईलाज झाला आणि पक्षात त्यांना स्थान देण्यात आले.आज राज्यात एक कुजबुज कॅंपेन सुरू आहे. सत्ता आली काय आणि गेली काय शरद पवारांना याचा फरकच पडला नाही असाही इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) म्हणाले.

Jitendra Awhad
Pandharpur News : ठाकरे गटाच्या जिल्ह्याध्यक्षांची तरूणाला जबर मारहाण; 'मुख्यंमंत्र्यांसमोरच पेटवून घेण्याचा इशारा..'

जितेंद्र आव्हाड म्हणाले, मागे तुमच्या सगळे माजी आमदार बसलेत. आणि नातू सगळे तुमच्या पुढे बसलेत. आत्तापर्यंत ती पिढी तुमच्या सोबत लढली आता ही नातवे तुमच्यासाठी लढायला पुढे आली आहेत. मुलगा सोडून गेला तरी नातू कधीच सोडून जात नाही. म्हणून ही सर्व नातवंच तुम्हांला धरून पुढे जाणार आहेत. बीड जिल्ह्याचे संपूर्ण वातावरण शरद पवारमय करणार यात काही शंका नाही. हा बीड जिल्हा भगवानबाबा यांचा जिल्हा आहे. जे समतेचे पुजारी आहे असेही आव्हाड म्हणाले.

'' गोपीनाथ मुंडेंनी माझ्यावरची केस पाठीमागे घ्यायला लावली...''

बीड दिवंगत गोपीनाथ मुंडें(Gopinath Munde)चा जिल्हा आहे. आणि त्यांचे आणि माझे संबंध अतिशय चांगले होते. मी विरोधी पक्षात असताना माझ्यावर केस झाली त्यावेळी माझी पत्नी त्यांना भेटायला गेली, तेव्हा त्यांनी तिला विचारले की जितेंद्र का आला नाही, तर ती म्हणाली त्यांना लाज वाटतेय कारण त्यांनी तुमच्या घरावर मोर्चा काढला होता. ते म्हणाले,वेडा आहे तो, राजकारणात असे चालत असते. पण त्याच्यावर खोटी केस पडली आहे, त्याचे आयुष्य मी बरबाद होऊ देणार नाही. त्याला एका मिनिटात घेऊन ये. त्याच्यावरची केस मी मागे घ्यायला लावतो. आणि त्याच गोपीनाथ मुंडेंनी माझ्यावरची केस पाठीमागे घ्यायला लावली. असे गोपीनाथ मुंडे होते.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com