Sandeep Kshirsagar Beed Speech: शरद पवारांच्या सभेच्या तयारीच्या बैठकीत आमदार संदीप क्षीरसागर यांनी परळीत जाऊन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या भाषणाची नक्कल केली होती. आजच्या सभेतही शरद पवारांच्या समोरच क्षीरसागर यांनी नाव न घेता मुंडे यांची नक्कल करुन दाखविली. (Sandeep Kshirsagar imitated Dhananjay Munde)
बीडमध्ये आज (ता. १७ ऑगस्ट) शरद पवार यांच्या स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या त्या सभेत आमदार क्षीरसागर बोलत होते. सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आदी उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले की, काय भाषणं करायची. मोठ्या व्यासापीठावर आम्ही कधी भाषणं केली नाहीत, आम्ही फक्त भाषणं बघायचो. काय हातवारे करायचे, असा..... असा.... मी नाव कोणाचं घेतलं नाही. तुम्ही म्हणाल नाव घेतलं म्हणून. ‘कोणाचाही नाद करा पण साहेबांचा नाद करायचा नाय’ असे एका भाषणात धनंजय मुंडे म्हणाले होते. मुंडे यांच्याच शैलीत संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांच्या समक्ष वरील वाक्य बोलून दाखवले. त्यावेळी उपस्थितीतून एकच जल्लोष झाला.
सोडून जाणारे नेते पूर्वी कशी भाषणे करायची, काय म्हणायची याची आठवण संदीप क्षीरसागर यांनी करुन दिली. मात्र, कोणी कोठेही गेले तरी जनता शरद पवारांसोबतच असल्याचे संदीप क्षीरसागर म्हणाले. ही मंडळी जेव्हा लोकांत जाईल तेव्हा लोक त्यांना जागा दाखवून देतील, असा इशाराही संदीप क्षीरसागर यांनी या वेळी दिला.
काही लोक आम्हाला म्हणाले की ‘आम्ही सत्तेत आहेात. आमच्यासोबत मोदी आहेत, तुमच्याकडे काय आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, आमच्याकडे साहेब आहेत. बीड आणि मराठवाड्याची जनता स्वभिमानी आहे. आयुष्यभर साहेब तुमच्यासोबत, तुमच्या विचारांसोबत राहील, असेही क्षीरसागार यांनी या वेळी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.