Sandeep Kshirsagar : महाराज, आम्हाला माफ करा! विशाळगड प्रकरणाबाबत आमदार क्षीरसागर यांची खंत

vishalgad encroachment : विशाळगडावरील अतिक्रमणे हटवली गेली पाहिजेत, पण हल्ला करण्याचे काय कारण ?
Sandeep Kshirsagar
Sandeep KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : चार दिवसांपूर्वी विशाळगडावर अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली घडलेल्या प्रकाराचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व आमदार संदीप क्षीरसागर यांनीही 'महाराज आम्हाला माफ करा' अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर करून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या विशाळगड या किल्ल्याच्या परिसरातील अतिक्रमण काढण्यासंबंधीचा वाद खूप जुना आहे. या संदर्भातील अनेक प्रकरणे न्यायप्रविष्टही आहेत. अतिक्रमणे हटवली गेली पाहिजेत, पण हल्ला करण्याचे काय कारण असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महाराज, आम्हाला माफ करा! आज आपल्या, बांदलांच्या आणि बाजीप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडाला काही लोक बदनाम करत आहेत. विशालगड येथील अतिक्रमणे ही मागील अनेक वर्षांपासून झालेली होती. ही अतिक्रमणे हटविली गेली पाहिजे यात दुमत नाही. परंतु अतिक्रमणे हटविण्याच्या नावाखाली विशाल गडापासून 4-5 किमी अंतरावरील ग्रामस्थांवर हल्ला करण्याचे काय कारण, असा सवालही संदीप क्षीरसागर Sandeep Kshirsagar यांनी उपस्थित केला.

अतिक्रमणे काढण्याबाबत काहीच दुमत नाही, ते जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचे काम आहे. परंतु ज्या ग्रामस्थांचा विशालगडावर अतिक्रमणांबाबत संबंध नाही, त्यांची घरे जाळण्याला, नासधूस करण्याला, प्रार्थनास्थळे तोडून टाकण्याचे कृत्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात घडले, याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असेही संदीप क्षीरसागर यांनी म्हटले.

Sandeep Kshirsagar
Satara Wagh Nakh News : उदयनराजेंनंतर फडणवीसही गोंधळले; औरंगजेब की अफझल खान...?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झालेला मोठा पराभवातून अशी कृत्ये होत असल्याची टीका क्षीरसागर यांनी केली. ते म्हणाले, लोकसभेत जनभावना आपल्या विरोधात गेली आहे. आता विधासभा निवडणुकीपूर्वी धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव सत्ताधाऱ्यांचा दिसतो. त्यातून महाराष्ट्राचे वातावरण बिघडवून निवडणुका जिंकण्याचे कटकारस्थान सत्ताधारी पक्ष रचत आहे का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

राज्याचे गृहमंत्री Devendra Fadnavis वारंवार दंगलींना खतपाणी घालत आहेत. परंतु एक लक्षात ठेवा हा शिवछत्रपतींचा, फुले - शाहू - आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. विचारांनी महान असणारे महाराष्ट्र आहे. तुमच्या विकृत विचारांचा प्रभाव माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रावर कधीच पडणार नाही, अशा भावना आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Sandeep Kshirsagar
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंकडून उपोषणाच्या काही तास आधीच शिंदे सरकारचं कौतुक; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com