Sharad Pawar News : भेटीसाठी आलेल्या मित्राच्या मुलाला शरद पवारांनी गाडीत बसवून घेतले...

NCP News : शरद पवार पुन्हा गोविंदबागेकडे जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी कृष्णा पाटील यांना गाडीजवळ बोलावून घेतले.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSararnama
Published on
Updated on

Marathwada Political News : महाराष्ट्र आणि देशातील राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार हे आपले सर्वपक्षीय नेत्यांशी असलेल्या चांगल्या संबंधासाठी ओळखले जातात. राजकीय मतभेदांमुळे वैयक्तिक संबंधामध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी नेहमीच घेत असतात. (Sharad Pawar News) संपर्क आणि संघर्षाच्या काळात ज्यांनी मोलाची साथ दिली त्या मित्रांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना तर शरद पवार कधीच अंतर देत नाहीत.

Sharad Pawar News
Nanded BJP News : भाजप जम्बो कार्यकारिणीला `मिशन ४५ प्लस`चे आव्हान पेलावे लागणार...

राज्यात असे अनेक नेते होऊन गेले ज्यांनी कधी काळी शरद पवारांना (Sharad Pawar) साथ दिली, पण त्यांची पुढची पिढी दुसऱ्या पक्षातून आपले राजकारण करतात. तरीही या नव्या पिढीमध्ये शरद पवारांबद्दलची आदराची भावना कायम आहे. (NCP) शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतल्या `पुलोद` आणि `समाजवादी काँग्रेस` प्रयोगाचे साक्षीदार मराठवाड्यातील तेव्हाच्या औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार दिवंगत साहेबराव पाटील डोणगावकर हे होते.

शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर जे शिलेदार त्यांच्यासोबत होते, त्यात साहेबराव पाटील आघाडीवर होते. (Maharashtra) समाजवादी काँग्रेस पक्षाकडूनच ते खासदारही झाले होते. साहेबराव पाटील यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजकारण करणारे कृष्णा पाटील डोणगावकर यांनी शरद पवार व त्यांच्या कुटुंबीयांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध जोपासले आहेत.

शरद पवार यांचा गोविंदबागेतील दिवाळी-पाडवा आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या भेटीगाठीचे राज्याच्या राजकारणात एक वेगळेच महत्त्व आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरचा हा पहिला दिवाळी-पाडवा भेटीचा कार्यक्रम असल्याने त्याकडे राज्याचे लक्ष लागले होते. कृष्णा पाटील डोणगावकर हे आवर्जून शरद पवारांची भेट घेण्यासाठी बारामतीला जात असतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही ते गेले, पण त्यांना थोडा उशीर झाला आणि शरद पवार हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना होण्यासाठी गाडीत बसले.

बारामती व्यापारी असोसिएशनचा मेळावा आणि त्याचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने कृष्णा पाटील डोणगावकर यांनी त्या कार्यक्रमस्थळी धाव घेतली. शरद पवारांना प्रत्यक्ष भेटून शाल देऊन त्यांचा सत्कार करण्याची कृष्णा पाटील यांची इच्छा होती. शरद पवारांनी व्यासपीठावरूनच ही तळमळ ओळखली आणि कार्यक्रम संपल्यावर भेटण्याचा इशारा केला. मेळाव्यातील मार्गदर्शन संपल्यानंतर शरद पवार पुन्हा गोविंद बागेकडे जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी कृष्णा पाटील यांना गाडीजवळ बोलावून घेतले.

Sharad Pawar News
Sanjay Raut : शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ 'संजय राऊतां'चा संपादक ते खासदार पदापर्यंतचा प्रवास...

उशीर झाला असे म्हणत गाडीत बसवून घेतले. गोविंदबागेपर्यंत्या १५ मिनिटांच्या प्रवासात शरद पवारांनी कष्णा पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, परिस्थिती यासह गंगापूर साखर कारखान्यासंदर्भातही चर्चा केली. काही मिनिटांच्या या भेटीत शरद पवारसाहेबांमधील ऊर्जा तसूभरही कमी झालेले नाही हे जाणवले. वडिलांसोबत त्यांची मैत्री होती, ते घरी यायचे तेव्हा मी खूप लहान होतो. अगदी मी त्यांच्या मांडीवर खेळलो म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

माझ्या राजकीय, सहकार क्षेत्रातील कामात त्यांनी कायम मदत केल्याचे कृष्णा पाटील डोणगावकर यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी पक्षात फूट पडली असली तरी पवारसाहेब डगमगले नाहीत, उलट भाजपला रोखण्यासाठी राज्यात महाविकास आघाडी आणि देशपातळीवर `इंडिया`ला अधिक बळ देण्याचा त्यांच्या प्रयत्न असल्याचे चर्चेतून जाणवले, असेही पाटील यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com