Dharashiv NCP News : धाराशिव राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली; पवारांना 'अ‍ॅक्शन' घ्यावी लागणार

NCP Sharad Pawar Political News : जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
NCP Sharad Pawar Political News
NCP Sharad Pawar Political NewsSarkarnama

Dharashiv News : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि धाराशिव जिल्हा यांच्यात एक वेगळं नातं आहे. शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीला धाराशिव जिल्ह्याने नेहमीच बळ आणि पाठिंबा दिला आहे. त्या मोबदल्यात पवारांनीही धाराशिव जिल्ह्याला भरभरून दिलं. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर धाराशिवमध्ये पक्षाची घडी विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कधीकाळी जिल्ह्यातील सर्वात सशक्त पक्ष असलेल्या शरद पवारांची राष्ट्रवादी गटबाजीमुळे खिळखिळी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुकांमध्ये आपली ताकद सिद्ध केली आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व एक खांबी होते. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपाचे कमळ हाती घेतले.

NCP Sharad Pawar Political News
Maratha Reservation: मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ

राणाजगजीतसिंह पाटील (Ranajagjitsinh Patil) यांच्यासोबत त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मधील एक मोठा गट भाजपात दाखल झाला. उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये नेता होण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. यावरून अनेकदा आपापसात जुंपल्यामुळे जिल्ह्याचे नेतृत्व कोणाकडे ? कोण जिल्ह्यामध्ये संघटना वाढवणार? पक्ष कोणाच्या हातात? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बेबनाव कधीकधी हमरीतुमरीपर्यंत पोहोचायचा, पण या छोट्या गोष्टींकडे लक्ष घालायला शरद पवारांनाही वेळ नव्हता.

आता तर राष्ट्रवादीत पुन्हा दोन गट तयार झाले आहेत. अजित पवारांना (Ajit Pawar) स्वतःकडे मोठ्या संख्येने कार्यकर्ते खेचून घेण्यात यश मिळाले. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा मोजकेच कार्यकर्ते शिल्लक राहिले. या मोजक्या कार्यकर्त्यांमध्येही नेता होण्यासाठी कमालीची स्पर्धा सुरू झाली आहे. जिल्हाध्यक्ष कोण? हा मोठा प्रश्न मागील वर्षभरापासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडवता आलेला नाही. हे गाऱ्हाणे थेट शरद पवार यांच्या समोरच जाऊन पोहोचले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवारांनी (Sharad Pawar) यातून मार्ग काढण्यासाठी माजी मंत्री राजेश टोपे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली. मात्र समन्वयकांना अद्याप याकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही अ्न हा प्रश्नही सुटला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले असून आता या कार्यालयाच्या उद्घाटनाला दुसरा गट उपस्थितच राहिला नाही.

दुसऱ्या गटाने दांडी मारल्यामुळे या दोन्ही गटांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शरद पवारांच्या समोर या दोन गटांमध्ये समन्वय साधून मार्ग काढावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना हे जमणार का? हा मोठा प्रश्न आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

NCP Sharad Pawar Political News
Konkan Politics : रत्नागिरीत मोठा राजकीय भूकंप? किरण सामंतांनी घेतली वडेट्टीवारांची भेट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com