Purushottam Dhondge Join Shivsena UBT : पुरुषोत्तम धोंडगे यांनी हाती बांधले शिवबंधन! नांदेडमध्ये उद्धवसेनेची खेळी..

In Nanded, Shiv Sena strengthens its political strategy as the son of a senior Shekap leader joins the party : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुरुषोत्तम धोंडगे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आदेशावरून लोहा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली होती.
Purushottam Dhondge Join Shivsena UBT News
Purushottam Dhondge Join Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded Politics News : शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते भाई केशवराव धोंडगे यांची सुपुत्र पुरुषोत्तम धोंडगे यांनी आज मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आपल्या समर्थकांसह प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता नांदेड जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धोंडगे यांच्या प्रवेशाने फायदा होऊ शकतो.

शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे संघटनात्मक वाढीसाठी नांदेड (Nanded) जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुरुषोत्तम धोंडगे यांच्या पक्ष प्रवेशासाठी अंबादास दानवे यांनी प्रयत्न केले होते. नांदेड जिल्ह्यामध्ये प्राथमिक चर्चा आणि भेटीनंतर अखेर आज मुंबईत मातोश्रीमध्ये पुरुषोत्तम धोंडगे आणि त्यांच्या समर्थकांचा पक्ष प्रवेश झाला. शिवसेना फुटीनंतर नांदेड जिल्ह्यात मजबूत असलेली शिवसेना आता ढिली पडली आहे.

जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणे पसंत केले. तर अनेकांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने नांदेडची जागा जिंकली होती. (Shivsena) मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जिल्ह्यात खातेही उघडता आले नाही. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे तयारी सुरू केली आहे. पक्ष फुटीनंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा नव्याने संघटन उभारण्याचे प्रयत्न शिवसेनेच्या वतीने सुरू आहेत.

Purushottam Dhondge Join Shivsena UBT News
Shivsena UBT News: उद्धव ठाकरे जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला झुंजवणार, 'असे' आहे प्लॅनिंग!

अंबादास दानवे यांच्याकडे हा जिल्हा सोपवण्यात आल्याने त्यांनी काही समाज मान्यता असलेल्या नेत्यांना पक्षात आणत पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार केला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते भाई केशवराव धोंडगे यांचे चिरंजीव पुरुषोत्तम धोंडगे यांना पक्ष प्रवेश देण्यात आला आहे. पाचवेळा आमदार आणि एक टर्म खासदार राहिलेल्या मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असलेल्या केशवराव धोंडगे यांचे चिरंजीव पुरुषोत्तम धोंडगे यांचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम आणि दांडगा जनसंपर्क पाहता अंबादास दानवे यांनी त्यांना शिवसेनेत आणत मोठी खेळी केली आहे.

Purushottam Dhondge Join Shivsena UBT News
Nanded Rain Update: नांदेडमध्ये थैमान! लेंडी धरण ओव्हरफ्लो, 6 गावांना पुराने वेढले

2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुरुषोत्तम धोंडगे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आदेशावरून लोहा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली होती. परंतु राज्यात सर्वच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेत मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या उमेदवारांना निवडून आणा, असे आवाहन केले होते. मतांचे विभाजन टाळण्याचा निर्णय घेत हे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर पुरुषोत्तम धोंडगे यांनी लोहा मतदारसंघातून माघार घेतली होती. धोंडगे यांच्या पक्ष प्रवेशाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लोहा- कंधारसह नांदेड जिल्ह्यात शिवसेनेला किती फायदा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com