Danve-Shinde News : अहो, त्यागमूर्ती..! अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा डिवचलं

Eknath Shinde, who lost the post of Chief Minister, gets the title of Tyagamurti : अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या एकत्रित फोटोवर भाष्य करत शिंदे यांना टोला लगावला आहे.
Pawar-Shinde-Fadanvis-Danve News
Pawar-Shinde-Fadanvis-Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 200 पार जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर भाजप महायुतीने जोरदार कमबॅक केले. या विजयाचा आनंद साजरा होत असताना महायुतीच्या तीनही नेत्यांचे टेन्शन मात्र सध्या वाढलेले दिसते. निवडणुकीचा निकाल लागून आठवडा होत आला आहे मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरलेले नाही.

अनेक नावांच्या चर्चा होत असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सरकार स्थापनेत आपला कोणताही अडथळा असणार नाही, असे स्पष्ट करत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून आपण बाद झाल्याची संकेत दिले. त्यानंतर मुंबई आणि दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू आहे.

Pawar-Shinde-Fadanvis-Danve News
Eknath Shinde : मुख्यमंत्री पद मिळत नसल्याने 1995 नंतर प्रथमच एकनाथ शिंदे गृहमंत्रीपद शिवसेनेकडे घेणार का ?

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या एकत्रित फोटोवर भाष्य करत शिंदे यांना टोला लगावला आहे. महायुती सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेला भाजपकडून वागणूक दिली जात आहे त्यावर दानवे यांनी शिंदेंना सुनावण्याची संधी साधली.

Pawar-Shinde-Fadanvis-Danve News
Ambadas Danve: तानाजीराव, किती प्रॉम्पटिंग करायचं! अरे, मुख्यमंत्र्यांना काही तरी बोलू द्या! VIDEO पाहा

अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मीडियावरील पेजवरून संभाव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पेढा भरवत असल्याचे छायाचित्र पोस्ट केले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे मध्यभागी उभे राहून हा पेढे भरवण्याचा कार्यक्रम पाहत आहेत. यावर त्रिमूर्ती आणि मधोमध 'त्यागमूर्ती' असा टोला दानवे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.

Pawar-Shinde-Fadanvis-Danve News
Mahayuti Politics : एकनाथ शिंदेंच्या नाराजीचं कारण काय? भरत गोगावलेंच्या बोलण्यातून झालं स्पष्ट

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची बोलणी वरिष्ठ पातळीवर सुरू होती. दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जागा वाटपामध्ये 'त्यागा'ची तयारी ठेवा, असा सूचक संदेश एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याची त्यावेळी चर्चा होती.

Pawar-Shinde-Fadanvis-Danve News
Mahavikas Aghadi : 'मी हे मान्य करणार नाही...'; काँग्रेसच्या नेतृत्वात 'मविआ'चं सरकार, पटोलेंच्या 'त्या' वक्तव्यावर राऊतांचा आक्षेप

यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये बराच कलगीतुराही रंगला होता. विधानसभा निवडणुकीतील यशानंतरही एकनाथ शिंदे यांना भाजपने खड्यासारखे बाजूला ठेवले, ज्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या आणि जिंकल्या त्या शिंदे यांना आता मुख्यमंत्रीपदावरून बाजूला करण्यात आले आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांना 'त्यागमूर्ती' असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com