Sandipan Bhumre News : शिंदेसेनेच्या आमदार, मंत्र्यांना अध्यात्माचा ओढा ; भुमरेंकडूनही शिवमहापुराण कथेचे आयोजन..

Paithan : भुमरे पैठण विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांची या मतदारसंघावर चांगली पकड आहे.
Sandipan Bhumre News
Sandipan Bhumre NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : राजकारणाला अध्यात्माची जोड देत आपली वोटबॅंक मजबुत करण्याचा प्रयत्न विविध राजकीय पक्षांकडून केला जातो. (Sandipan Bhumre News) राज्यातील सत्तांतर आणि घडामोडीनंतर सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्र्यांचा ओढा सध्या अध्यात्माकडे जास्त असल्याचे दिसून येत आहे. दादा भूसे, आमदार प्रदीप जैस्वाल आणि आता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी देखील अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे.

Sandipan Bhumre News
Mla Ramesh Bornare News : आमदाराने तक्रार करताच आरटीओचे पथक पहाटे चार वाजता कामाला..

चिरंजीव विलास उर्फ बापू भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुमरे कुटुंबाकडून (Paithan) पैठण येथील एकनाथ मंदिर परिसरात शिवमहापुराण कथेचे आयोजन केले होते. या कथेला गेल्या दहा दिवसांपासून संदीपान भुमरे व त्यांच्या कुटुंबीयांनी हेजरी लावली. (Shivsena) विलास भुमरे यांच्याकडे पैठणचे भावी आमदार म्हणून बघितले जाते. तसा उल्लेख त्यांचे समर्थक गेल्या वर्षभरापासून बॅनर, पोस्टरबाजीतून करतांना दिसतात.

संदीपान भुमरे पैठण विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांची या मतदारसंघावर चांगली पकड असली तरी शिंदेच्या बंडात त्यांचा सहभाग असल्याने त्यांच्यावर ठाकरे गटाकडून गद्दारीचा शिक्का मारला जातोय. (Marathawada) शिवसेनेशी गद्दारी करणारे पुन्हा निवडून येत नाहीत, हा इतिहास भुमरे यांना चागंलाच माहित असल्याने ते कोणतीही जोखीम घ्यायला तयार नाहीत.

शिवमहापुराण कथेचा राजकारणाशी काहीही संबंध नाही असे सांगितले जात असले तरी या माध्यमातून आपली वोटबॅंक मजबूत करण्याच हा एक प्रयत्न असल्याची चर्चा आहे. यापुर्वी शिंदे गटाचेच मंत्री दादा भुसे यांनी आपल्या मालेगाव मतदारसंघात मध्यप्रदेशातील प्रसिद्ध कथाकार पंडीत मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन काही महिन्यांपुर्वी केले होते.

गेल्या महिन्यात शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी देखील १ ते ७ जून दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन केले होते. त्यानंतर आता संदीपान भुमरे यांनी त्यांच्या पैठण मतदारसंघात समाधान महाराज शर्मा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन केले. गेल्या वर्षभरात ठाकरे गटाकडून संदीपान भुमरे यांना टार्गेट करण्यात आले होते. आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, संजय राऊत, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे अशी नेते मंडळी भुमरे यांच्याविरोधात मैदानात उतरली आहे.

Sandipan Bhumre News
Purna Sugar Factory News : पुर्णा साखर कारखान्यावर राष्ट्रवादीच्या दांडेगावकरांचेच वर्चस्व...

पैठणमध्ये सभा, मेळावे, महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून ठाकरे गट भुमरेंच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले होते. राष्ट्रवादीतील बंडाआधी अजित पवारांनी देखील पैठणमध्ये येऊन आपल्या खास शैलीत भुमरे यांच्यावर टीका केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर भुमरेंकडून शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. मतदारसंघातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद या कथेला मिळत आहे. राजकारणात असूनही मंत्री, आमदार अध्यात्माकडे वळत आहेत, हे ही नसे थोडके, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com