Hemant Ogle : दिवसाढवळ्या गोळीबार; आमदार ओगलेंसमोरच गुन्हेगारीचा थरार : पोलिसांना म्हणाले, "तुम्हीही सामील आहात"

Shirampur firing case : अहिल्यानगरच्या श्रीरामपूर इथे शुक्रवारी (ता.29) दिवसाढवळ्या राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यावर झालेल्या गोळीबार प्रकारावरून काँग्रेस आमदार ओगले यांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले.
Hemant Ogle
Hemant OgleSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News, 30 Aug : अहिल्यानगरच्या श्रीरामपूर इथे शुक्रवारी (ता.29) दिवसाढवळ्या राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यावर झालेल्या गोळीबार प्रकारावरून काँग्रेस आमदार हेमंत ओगले चांगले संतापले.

शहरात शुक्रवारी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यावर झालेल्या गोळीबारानंतर चांगलीच तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर काँग्रेस आमदार ओगले यांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले.

घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर व निरीक्षक नितीन देशमुख यांची आमदारांनी सरळ खरडपट्टी काढत शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर संताप व्यक्त केला.

Hemant Ogle
Maratha Reservation : तिकडे जरांगेंचा आझाद मैदानातून न निघण्याचा निर्धार अन् इकडे फडणवीस सरकारने मराठा समाजाबाबत घेतला मोठा निर्णय!

"श्रीरामपूरमध्ये सुरू असलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे. तीन वेळा सांगूनही काहीच परिणाम झालेला नाही. माझ्यासमोर शहराच्या गल्ल्यांमधून युवक पिस्तूल घेऊन धावत आहेत. नागरिकांच्या अंगावर काटा उभा राहतोय आणि आपण हातावर हात धरून बसला आहात.

या सर्व घटनांना तुम्हीच जबाबदार आहात. इतकेच नव्हे तर या गुन्हेगारांबरोबर तुम्हीही सामील आहात," असा खळबळजनक आरोप आमदार ओगले यांनी यावेळी केला. आमदार ओगले यांनी पुढे सज्जड दम देत स्पष्ट इशारा दिला की, "हे गँगवार आत्ताच्या आत्ता थांबले पाहिजे.

Hemant Ogle
Jalgaon News : भाजप आमदाराचा स्फोटक आरोप : पोलिस निरीक्षकाकडून महिलेचे लैगिंक शोषण, तक्रार केली तर गोळी घालण्याची धमकी

या टोळ्या शहरातून हद्दपार करा. यापुढे अशा घटना मी खपवून घेणार नाही. आतापर्यंत खूपदा सांगून झाले, पण यापुढे मात्र मी शांत बसणार नाही." विधानसभा निवडणुकी दरम्यानही नागरिकांना घरातून खेचून मारहाण करण्यात आली होती, कपडे फाटेपर्यंत मारझोड झाली होती.

त्यामुळे वेळेवर अंकुश न बसल्यास शहर राहण्यालायक राहणार नाही, अशी भीतीही आमदारांनी व्यक्त केली. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पथके रवाना केल्याचे सांगितले. "आरोपींच्या शोधासाठी दोन पथके पाठवण्यात आली असून लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन वातावरण शांत केले जाईल," असे त्यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com