Ajit Pawar : अजित पवारांनी काढला सतेज पाटलांना चिमटा; म्हणाले "बंटीला आता बंटी झाले तरी..."

Satej Patil : कोल्हापूरच्या सभेत राज्य सरकारवर टीका
Ajit Pawar, Satej Patil
Ajit Pawar, Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar and Satej Patil : विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या स्पष्टोक्तेपणाबद्दल ओळखले जातात. कुणाचीही भीड न बाळगता ते संबंधितास जाग्यावरच स्पष्ट बोलून विषय मिटवितात. असे असले तरी अजितदादांची सभा म्हणजे फटकेबाजी, टोले अन् हस्यकल्लोळ हे समीकरणच निर्माण झाले आहे. त्याचीच प्रचिती शनिवारी (ता. २०) कोल्हापूर येथे आली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांच्यावर मिश्किल टिपण्णी केली.

कोल्हापूर येथील एका खासगी कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) उपस्थित होते. यावेळी पवार यांनी पाटील यांना टोपणनावावरून चिमटे काढले. अजित पवार म्हणाले, "मी कितीतरी वेळा सांगतोय की बंटीला आता बंटी म्हणणे बंद करा. बंटीला आता बंटी झाले."

Ajit Pawar, Satej Patil
Ajit Pawar News : आमच्यापासूनच भाकरी फिरवायला सुरुवात करणार; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

यानंतर अजितदादांनी (Ajit Pawar) आपला मोर्चा ऋतुराज पाटील यांच्याकडे वळविला. ऋतुराज हे नाव उच्चारताना किती मस्त वाटते, असे म्हणत त्यांनी त्यांच्यावर जास्त बोलणे टाळले. तसेच ऋतुराज पाटील यांच्याच कार्यक्रमात त्यांच्यावर बोलू, असेही सांगितले. पवारांच्या या मिश्किल वक्तव्यानंतर उपस्थितांत चांगलाच हस्या पिकाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Ajit Pawar, Satej Patil
Bhagatsingh Koshyari News: भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; कारण काय?

यावेळी पवार यांनी राज्य सरकारवरचाही (State Government) टीका घेतली. पक्षपाती करून राज्य सरकार विरोध पक्षांतील पदाधिकाऱ्यांच्या अनेक फाईल दाबून ठेवण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला.

पवार म्हणाले, "राज्य सरकारमधील मंत्री फक्त विरोध पक्षाच्या पदाधिकारी असल्याने फाईल्स क्लिअर करत नाहीत. ते करण्यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदार मंत्र्यावर दबाव आणतात. माझ्या काळात कुणाचेही कामे थांबविली नाहीत. सरकार येते, सरकार जाते. चार दिवस सासूचे तर चार दिवस सूनचेही असतात. जिल्ह्यातील कामे एका व्यक्तीची नसतात. ती जनतेची असतात."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com