शिवसेना नेते सुभाष साबणे भाजपमध्ये प्रवेश करणार; महाविकास आघाडीला मोठा धक्का

देगलूर विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

देगलूरः देगलूर विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र, देगलूरमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते माजी आमदार सुभाष साबणे (Suhas Sawane) हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच सुरशीची होणार असल्याचे सांगितले जात आहे. (Shiv Sena leader Suhas Sawane joins BJP)

Devendra Fadnavis
लक्झरी क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीचा छापा: 10 जण ताब्यात

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेचे नेते सुभाष साबणे यांनी भेट घेतली. त्यानंतर साबणे यांनी भाजमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळे त्रास होत असुण आणि त्यांच्यामुळेच भाजपमध्ये जात असल्याचे म्हटले आहे.

Devendra Fadnavis
ममता बॅनर्जी फक्त 3680 मतांनी पुढे

पोटनिवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला हा मोठा धका मानला जात आहे. साबणे हे शिवसेनेचे मराठवाडा प्रतोद, विधानसभेचे तालिका सभापती राहिलेले आहेत. तर ते तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. साबणे यांना पक्षात घेण्यासाठी भाजपची बैठक झाली होती. त्या बैठकीला खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी सुभाष साबणे यांच्या पक्ष प्रवेशासंदर्भात चर्चा झाली होती. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता ते भाजपचे उमेदवार असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com