High Court News : उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या निवडीला आव्हान! गैरहजर प्रतिवाद्यांना शेवटची संधी

Shiv Sena MLA Praveen Swami's election challenge in the bench court. : 6 फेब्रुवारीला याचिका सुनावणीस निघाली असता प्रतिवादींना नोटीस मिळूनही कोणीही सुनावणीस हजर झाले नाही. खंडपीठाने शेवटची संधी देत निवडणूक याचिकेवर 18 फेब्रुवारी 2025 रोजी सुनावणी ठेवली आहे.
Bombay High Court bench Aurangabad
Bombay High Court bench AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Shiv sena News : उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. न्यायामूर्ती अभय वाघवसे यांनी आमदार स्वामी यांच्यासह सर्व उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला होता. 6 फेब्रुवारीला याचिका सुनावणीस निघाली असता प्रतिवादींना नोटीस मिळूनही कोणीही सुनावणीस हजर झाले नाही.

खंडपीठाने शेवटची संधी देत निवडणूक याचिकेवर 18 फेब्रुवारी 2025 रोजी सुनावणी ठेवली आहे. (Aurangabad High Court) प्रतिवादी हजर न झाल्यामुळे याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी अर्ज देवून प्रकरण एकतर्फी चालविण्याची परवानगी देण्याची विनंती केली. खंडपीठाने त्यांचा अर्ज रेकॉर्डवर घेतला. चौगुले यांनी ॲड. शैलेश गंगाखेडकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. त्यांच्यावतीने ॲड.महेश देशमुख काम पाहत आहेत.

त्यांनी याचिकेत विविध आक्षेप नोंदविले आहेत. नामनिर्देशपत्रे दाखल करण्याची वेळ सकाळी 11 ते 3 असताना स्वामी यांचे नामनिर्देशनपत्र निर्धारीत वेळेनंतर दाखल झाले. निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्धारीत वेळेनंतर त्यांना शपथ दिली. (Shivsena) उमेदवाराच्या वैयक्तीक माहिती सोबतच्या नमुना-26 प्रमाणेच्या शपथपत्रावर शपथेचा व तारखेचा उल्लेख व शिक्का नाही.

Bombay High Court bench Aurangabad
Umarga Vidhansabha : शिंदेंच्या माजी आमदारामुळे ठाकरेंच्या 'या' शिलेदाराची आमदारकी धोक्यात?

स्वामी हे जंगम जातीचे असताना त्यांनी एस.सी.साठीच्या राखीव मतदार संघातून नामनिर्देशनपत्र भरले तसेच निवडणूकीचा खर्च 10 हजारापेक्षा जास्त झाला असेल तर धनादेशाद्वारे खर्च करणे अनिवार्य असताना स्वामी यांनी 10 हजारापेक्षा अधिक खर्च रोखीने केला असल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. स्वामी जिल्हा परिषदेत शिक्षक होते. त्यांनी 25 ऑक्टोबर 2024 ला नोकरीचा राजीनामा दिला व तो मंजूरही झाला.

Bombay High Court bench Aurangabad
High Court News : केजच्या भाजपा आमदार नमिता मुंदडा यांच्या निवडीला आव्हान!

त्यानंतर त्यांनी 28 आणि 29 ऑक्टोबरला नामनिर्देशनपत्रे भरली. विशेष म्हणजे त्यांचा राजीनामा 25 ऑक्टोबरला मंजूर झाल्यानंतरही त्यांनी 31 ऑक्टोबर पर्यंतचा पूर्ण पगार उचलला. म्हणजे त्यांनी ‘लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 100(1)(अ) आणि घटनेच्या कलम 191(1)(अ) नुसार अपात्र असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com